चोहट्टा येथे कोरोना योद्धाना मास्क चे वाटप

173

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

कोरोना कोविड 19) ने आपले पाय पसरून शहरासह ग्रामीण भागात पोहोचला या मुळे जनतेमध्ये भीती युक्त वातावरण झाले आहे.या संकट काळात पोलीस स्टेशन ग्रामीण चे अधिकारी व प्रमुख तथा कर्मचारी हे आपले योगदान देत कोरोनाग्रस्त रुग्ण व त्या परिसरात भेटी देऊन आपले कर्तव्य बजावीत आहेत.त्यांची ही सेवा बघून दूरदृष्टी असणारे भाजपा नेते केंद्रिय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी पुढाकार घेऊन कोरोना योद्धांना उच्च प्रतीचे एन 95 चे मास्क उपलब्ध करून दिले.दि. 13 जुलै ला आकोट ग्रामीण मध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कावसा रुग्णालय,सावरा ग्रामीण रूग्णालय पोलिस चौकी चौहट्टा,काॅरन टाईम सेंटरे देवरी फाटा येथे मास्क चे वितरण करण्यात आले.यावेळी भाजपचे राजेश नागमते तालुका अध्यक्ष प्रा.अशोकराव गांवडे ,जिल्हा चिटणीस मधुकर पाटकर,भाजयुमो तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड, सुनिल गिरी,डाॅ.
ताकोते ,ऊमेश ऊबरकार, सतिश सावकार, गजानन यादव,सतिश खंडात, डाॅ. वालसिगे सावरा डॉ. वडतकार मॅडम, कावसा, पोलिस चौकी चौहट्टा यांनी या प्रसंगी खाजदार धोत्रे आभार मानले.