तलवारीच्या धाकावर मारण्याची धमंकी देणाऱ्या व जातिवाचक शिविगाळ करणाऱ्या आरोपीनां आमगाव पोलिसांनी अखेर केली अटक..

435

सचिन शामकुवर
तालुका प्रतिनिधी आमगाव
तलवारीच्या जोरावर धाक दाखवून जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या व जिवंतपणे मारण्याची धमंकी देणाऱ्या,४ आरोपींना अखेर आमगाव पोलिसांनी अटक केली.
वेळेत आरोपींना अटक न करणाऱ्या आमगाव पोलिसांची भुमिका संसयास्पद वाटू लागल्यामुळे आज अखेर अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्त आपल्या सहकाऱ्यांना घेवून पोलिस स्टेशन आमगाव येथे धडकले,व जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही,तोपर्यंत पोलिस स्टेशन परिसरातील बाहेरील भागातून आम्ही हटनार नाही,असी भुमिका अन्याय व अत्याचाग्रस्तांनी घेतली.
यामुळे आमगाव पोलिसांनी अखेर आरोपींना जेरबंद केले व अटक करून पोलिस स्टेशन आमगाव येथे आणले.
इंशात भाऊदास सोनटक्के यांना जातिवाचक शिविगाळ करीत तलवारीने जिवे मारण्याची धमकी देवुन आरोपी बिनधास्तपणे आमगांव शहरात फिरत आहेत..
त्या आरोपीना शिघ्र अटक करण्यात यांवा म्हणून,कुभारटोली. रिसामा,भिमनगर,महादेव पहाड़ी,येथील महिला व पुरूषांनी आमगाव पोलिस स्टेशन मध्ये धडकले…
परिणामतः आमगाव पोलिसांनी प्रकरण चिघळू नये या संबंधाने खबरदारी घेतली व आरोपी देवा बोकडे,अशोक बोकडे,जय सोनकुसरे व बादल यांना अटक केली.मात्र,तक्रारदारांना,तलवारीने जिवानिशी मारण्याची धमंकी देणाऱ्या आरोपींवर परत जादा गुन्ह्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे प्रतिक्रिया जनसामान्यांच्या आहेत..