वणी शहरातील प्रसिद्ध दिपक चौपाटी ची कोणी हाक अइकनारा का…..धाप्यावरील खड्डयात जिवहानी झाल्यावर लक्ष देणार का?

0
75

 

वणी:- विशाल ठोबंरे

गेल्या एक महिण्या पासुन जत्रा रोड वरचा धापा रस्त्याच्या मधोमध फुटल्यामुळे भलामोठा खड्डा पडला आहे.या रस्त्यावरुन ये- जा करणार्यांचा जिव धोक्यात आला आहे.तसेच
दोन तीन दा अपघात सुद्धा झाले आहे.परंतु नगर परिषद कुंभकर्णी झोपेत आहे. अगर या खड्यात एखाद्याचा जिव गेला तर कोण जबाबदारी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील रंगनाथ स्वामी चौक म्हणजे दिपक चौपाटी या परीसरातील जत्रा मैदान रोड या रोडनी खुप ट्रॅफिक असते या चौकात धापा आहे. तो गेल्या एक महिण्या पासुन मधोमध फुटलेेलाआहे. त्या परीसरातील रविवारला आठवडी बाजार भरत असल्यामुळे खुप गर्दी असते, परिणामी त्या फुटलेल्या धाप्या मुळे ट्रॅफिक सुद्धा जाम होते. त्याचं परीसरातील लोकांनी अपघात होऊ नये या साठी तिथे लाल झेंडा आणी गुल्वाल बुका लाऊन न.प.च्या नावाने दोन चार गोटे सुद्धा ठेवले आहे.
हि चौपाटी फक्त अवैद्य धंद्यासाठी साठी आहे.का? असे परीसरातील जनतेकडून बोल्या जात आहे.
त्या धाप्यावर एखाद्याचा जिव गेल्या वरच चेव एईल का असे नागरिकातून बोल्या जात आहे.