Home Social डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे आधुनिक जग अधिक सक्षम : इंजि.चैतन्य कंद्रेगुला…. — आरसीईआरटीमध्ये...

डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे आधुनिक जग अधिक सक्षम : इंजि.चैतन्य कंद्रेगुला…. — आरसीईआरटीमध्ये “वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे – २०२६”…..

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका 

चंद्रपूर :

   सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग तथा द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), चंद्रपूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे – २०२६” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

       “Digital Lifelines – Strengthening Resilience in Connected World” या विषयावर आधारित हा कार्यक्रम १९ मे २०२६ रोजी महाविद्यालयातील IE हॉलमध्ये प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत पार पडला.

      या कार्यक्रमास बीएसएनएल,चंद्रपूर येथील इंजि.चैतन्य कंद्रेगुला हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.तसेच IE(I) चंद्रपूर लोकल सेंटरचे चेअरमन एर.एस.पी.बगला,मानद सचिव डॉ.बी.एस.गांगुली,विभागप्रमुख डॉ.आर.के.कृष्णा व इंजि.पी.पी.धनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

      प्रास्ताविक इंजि.पी.पी.धनकर यांनी केले.यावेळी दूरसंचार,डिजिटल नेटवर्क आणि आधुनिक कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.प्रमुख वक्ते इंजि.चैतन्य कंद्रेगुला यांनी फायबर ऑप्टिक केबल,LAN नेटवर्क,डेटा कम्युनिकेशन तसेच जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

       कार्यक्रमाचे संचालन प्रा. हेमलता पांगंटीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.पी.एन.मत्ते यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.पी.एन.मत्ते,प्रा.अनुराधा दाखणे व विभागातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.