राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा सती नदीवरील पुल व रस्ता कामाचा वेग मंदावल्याने कार्य स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.
अनेक दिवसांपासून काम सुरू असतानाही अपेक्षित गतीने प्रगती होताना दिसत नाही, अश्या स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या याबाबत कार्यस्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या काही महिन्यांत पावसाळा सुरू होणार असल्याने नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी काम तातडीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या.
पुल व रस्ता हे स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही.
यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा श्री. जिवन पाटील नाट व माजी सभापती श्री. गिरीधर तितराम उपस्थित होते.



