Home Social इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून जनतेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील...

इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून जनतेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन :- सरपंच नितीन सरवदे… — ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी सरपंच नितीन सरवदे…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

           निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीतील विद्यमान सरपंच नितीन नामदेव सरवदे यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

            या प्रसंगी सरपंच नितीन सरवदे बोलत आसताना म्हणाले की गावचे कुलदैवत लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद पाठीशी आसल्यामुळेच मी नरसिंहपुर गावचा सरपंच झालो याचा मला अभिमान आहे. तसेच तालुक्यातील जनतेनेही माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे आज राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार व महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या तालुका अध्यक्ष पदी माजी नियुक्ती झाल्यामुळे मला आनंद वाटत आहे.

             इथून पुढे सेनेच्या माध्यमातून जी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आसेल त्याचे पालन करून जनतेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन निवडी प्रसंगी नितीन सरवदे बोलत होते. 

           तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार व महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पुढील वाटचालीस नितीन सरवदे यांना शुभेच्छा दिल्या.

        याप्रसंगी तालुक्यातील व भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.