राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
कुरखेडा तालुकातंर्गत मौजा मालेवाडा येथील बॅंक द्वारा शेतकऱ्यांकडून शक्तीने कर्ज वसूल करु नये म्हणून संचालक आणि शेतकऱ्यांनी बॅंक व्वस्थापकास आज २७ फेब्रुवारी २०२६ रोज शुक्रवारला निवेदन दिले.
महाराष्ट्रातंर्गत खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकरी कर्जमाफी योजने बाबत,महाराष्ट्र शासनाने अनेकदा घोषणा केल्या की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार व सरसकट कर्ज माफी करणार.
परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी मिळण्याकरिता अनेक जाचक अटी लादल्या गेल्या आहेत.कोणत्याही जाचक अटी न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सतत नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस,कमी उत्पादन आणि बाजारभावातील चढ-उतारपणा,यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
म्हणूनच शेतकऱ्यांकडून थकीत व चालू पिक कर्जाची रक्कम सक्तीने वसूल करु नये,असे निवेदनात नमूद आहे.
शासणाच्या उदासिनपणामुळे शेतकऱ्याची आर्थीक परीस्थीती हलाकीची आहे.शेतकऱ्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये,असे प्रकार घडल्यास शासनासह आपण स्वतः जबाबदार असाल असा इशारा निवेदना द्वारे दिला आहे…
निवेदन देताना युवराज पाटील बावनथडे रा.येंगलखेडा,श्रीमती अनुसयाताघ पेंदाम सरपंच मालेवाडा,श्रीमती सुरखताई वनस्कर सदस्य,श्री.बळकृष्ण शेडमाके सभापती आविका मालेवाडा,श्री.अंबरशाजी पारसे सभापती आविका येंगलखेडा,श्री.दयारामजी उसेंडी सभापती आविका अंगारा,श्री.शालीकरामजी परसा सभापती आविका सुरखुंडी,श्री.उद्धवजी पेंदाम संचालक आविका मालेवाडा.श्री.दिपकजी शेंडे संचालक आविका सुरखुंडी,श्री. उत्तमजी कोसरे संचालक आविका येंगलखेडा,श्री.राजेशजी आत्राम संचालक आविका येंगलखेडा,श्री विजयशा सयाम संचालक आविका मालेवाडा,श्री.जयवंत कापकर शेतकरी बांधगाव,श्री. मनोजभाऊ लेनगुरे माजी उपसरपंच मालेवाडा.श्री.महादेव पेंदाम शेतकरी,श्री.माविकजी कमरो शोतकरी – चांदोना,श्री गिरीधर पोटावी शोतकरी मलेवाडा शेतकरी,श्री.दिपक ताडामी शेतकरी आंधळी,श्री.गंगाधर सयाम संचालक आविका मालेवाडा,श्री.मेशजी भेलकर शेतकरी नेहारपायली.श्री.दादापाटील सुकारे उपसभापती आविका अंगारा,यांच्या निवेदनावर सह्या आहेत.



