Home Political उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साथ देण्यासाठी घड्याळ चिन्हावर मतदान करा, नऊ तारखेला...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साथ देण्यासाठी घड्याळ चिन्हावर मतदान करा, नऊ तारखेला विजय आपलाच आहे :-शिवाजी (दादा पाटील) मोहिते… — तरुण मतदार व कार्यकर्ते पाठीशी आहेत म्हणूनच मतदार संघातील सर्व गावांचा चौफेर विकास होणारच…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          भरती नाथाच्या पावन भूमीतील सुपुत्र व टणु गावचा ढाण्या वाघ आणि पंचायत समितीचे भावी सदस्य शिवाजी (दादा पाटील) माहिते हे पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकीसाठी लुमेवाडी गणातून उभे असल्यामुळे भागाभगातून तरुण कार्यकर्त्यांची चांगलीच साथ मिळालेली आहे. 

         शिवाजी (दादा पाटील) मोहिते यांच्या प्रचाराला मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संचालक आप्पासाहेब जगदाळे, यांचे हात बळकट करण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रुपी घड्याळ या चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्या.

           इंदापूर तालुक्याच्या काना कोपऱ्यात घड्याळाला साथ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी भेटी, गाठी ,संवाद आणि विकासा भिक्षुक यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. लुमेवाडी गणात परिवर्तन होणारच असल्याचे दिसू लागले आहे.

         शिवाजी (दादा पाटील) मोहिते यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात वातावरण चांगलेच निर्माण झालेले आहे. नरसिंहपुर, टणु , गिरवी, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, सराटी, चाकाटी, निमगाव भगतवाडी आधी सर्व भागातील मतदार राष्ट्रवादी़़ चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतांनी शिवाजी (दादा पाटील) मोहिते यांनाच विजय करणार असल्याचे बोलत आहेत.

         प्रचाराचा अंतिम टप्प्या चालू असून मतदान घडवून आण्यासाठी आणखी गती मिळालेली आहे शिवाजी (दादा पाटील)मोहिते हे जास्त मतदान मिळवून पंचायत समितीवर विजय मिळवतील. हे चित्र दिनांक 9 तारकेला पहावयास मिळणार.