Home उपक्रम ग्रामगीता महाविद्यालयाच्या रासेयो विभागाद्वारे ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाडा संपन्न…

ग्रामगीता महाविद्यालयाच्या रासेयो विभागाद्वारे ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाडा संपन्न…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे स्वच्छता ही सेवा अभियान 2025, भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिनांक 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2025 या पंधरवड्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

         या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण, सार्वजनिक स्थळांची (चिमूर बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय, हजारे पेट्रोल पंप चौक, इत्यादी) स्वच्छता, पर्यटन स्थळांची (सात बहिणी डोंगर आणि घोडाझरी) स्वच्छता इत्यादी तसेच स्वच्छता जनजागृती आणि विविध स्पर्धेच्या आयोजन, यांच्या समावेश होता.