कडक उन्हावर मात करून गरजू रुग्णासाठी 35 युवकांनी कुरखेडा येथे केले रक्तदान… — संकल्प फाउंडेशन समाज सेवी संस्थेचा मानवतेच्या सेवेचा उपक्रम..

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

गडचिरोली :- जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त पेढी मध्ये रक्ताची कमतरता असल्यामुळे ही बाब लक्षात येताच संकल्प फाउंडेशन समाज सेवी संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा करण्यात आले होते त्या शिबिरामध्ये 35 युवकांनी रक्तदान केले.

          अहिल्या बाई होळकर यांची जयंती साजरी करून रक्तदान शिबिर घेण्यात आले.या प्रसंगी राज्य स्तरावरील उपसंचालक कार्यालय नागपूर येथून आलेले कायाकल्प तपासणी पथकातील अधिकारी डॉ.राहुल कन्नमवार ,डॉ.साजिया शर्मा,बाह्य संपर्क अधिकारी डॉ.बागराज धुर्वे ,डॉ.अनुपम महेश गौरी ,रुग्ण कल्याण समिति सदस्य विवेक निरंकारी,दैनिक लोकमत चे तालुका प्रतिनिधी तथा रूग्ण कल्याण समिति सदस्य सिराज पठाण, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित ठमके,भाजपा तालुकध्यक्ष चांगदेव भाऊ फाये ,नगरसेवक सागर निरंकारी ,सहाय्यक अधिसेविका पुष्पलता खवड, दैनिक भास्कर चे पत्रकार कृष्णा चौधरी,दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी प्रा.विनोद नागपूरकर,पुष्पराज रहांगडाले,दीपक धारगाये उपस्थित होते.

          रुग्णालयामध्ये गर्भवती माता,अपघातात अतिरिक्त रक्तस्त्राव झालेले, सीकल सेल ग्रस्त रुग्ण ,थ्यालेसिमिया,प्रसूती पश्चात शस्त्रक्रिया झालेले रूग्ण,गंभीर आजार इत्यादींना रक्ताची नियमित गरज भासत असते परंतु जिल्हा रक्त पेढी मध्ये रक्ताची कमतरता असल्यामुळे त्यांना वेळेवर रक्त मिळण्यास अडचणी येत असल्याचे समजताच संकल्प फाउंडेशन समाज सेवी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले.त्या शिबिरामध्ये कुरखेडा व परिसरमधील युवकांनी उन्हाचा पारा 45 %असताना तसेच हवामान खात्याने हाई अलर्ट ची सूचना दिली असताना त्यावर मात करून रक्तदान केले.

        1) देवेंद्र फाये,2)डॉ.जगदीश बोरकर,3)डॉ.नितीन कटरे ,4)धनराज नाकाडे,5) रविंद्र बाळबुधे 6)नितेश लांजेवार,7)जयचंद सहारे,8)विनीत काचीनवार,9)जगदीश नाकाडे,10)प्रकाश कुमरे,11)भाविक रोकडे,12)हेमराज नंदेश्र्वर,13)संतोष दाने,14)नितीन गडेगोने,15)तनय खरवडे,16)राहुल कोहळे,17)पराग बोरकर,18)लतिष नाकतोडे,19)खिरसागर उईके, 20)शाहरुख पठाण,20)लखन खूने 22) जयंत बनकर,23) किशोर भोंडे,24)नामदेव आडील,,25)हसन वाखोडे, 26)अनुप जोगे, 27)फलींद्र मांडवे 28)भूषण बोरकर 29),निलेश चंदनखेडे 30)रोहित नीपाने,31)कलश सोणकर 32)बोगणलाल सारवा 33)सनोज शेंडे,34)श्याम उईके 35)धीरज बांगरे इत्यादी युवकांनी स्वयं स्फुर्तीने रक्तदान केले.

           रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.जगदीश बोरकर,डॉ.प्राजक्ता दुफारे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे, धम्मप्रिया झाडे,तिकेशस्वरी करमकार तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ.अशोक तुमरेटी ,डॉ.अंकित गिरपंजे,राहुल शिदाम,नितेश सोनवणे,आकाश आंबेरकर,जीवन गेडाम, बंडू कुमरे,तसेच संकल्प फाउंडेशन संस्थेचे अतुल अंबादे,राहुल पाटणकर भूषण बोरकर,मनीष मेश्राम यांनी सहकार्य केले.