श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनांचे डि.बी.टी.पोर्टलद्वारे होणार अर्थसहाय्याचे वितरण.. — तहसीलदार चिमूर यांच्या कार्यालयात बॅंक पासबुक, रेशनकार्ड व आधारकार्डची झेरॉक्स प्रत,मोबाईल क्रमांक, लाभार्थ्यांनी देण्याचे तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी केले आव्हान..

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

       विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. 

       या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक झाले आहे.याकरीता लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड,बँक खाते, रेशन कार्ड व मोबाईल नंबर, तहसिल कार्यालय,चिमूर येथील संजय गांधी योजना शाखेत जमा करावे असे आवाहन तहसिल कार्यालयाद्वारे करण्यात आले होते.

     ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले आधार कार्ड,बँक खाते, रेशन कार्ड व मोबाईल नंबर तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी निराधार विभागात सादर केले नाही. त्यांनी तात्काळ वरील कागदपत्रे संजय गांधी योजना शाखेत तहसिल कार्यालय,चिमूर येथे सादर करने आहे.

      तसेच चिमूर तालुक्यातील सर्व निराधार योजनेतील लाभ घेणाऱ्या लाभार्थी यांना कळविण्यात येते की,सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट, 2019 नुसार शासनाकडून देण्यात येत असलेल्या निराधार योजनेतील लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला घेण्याबाबतचे निर्देश आहे.

    त्या अनुषंगाने राज्य शासन पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी यांनी नोंद घेवून उपरोक्त प्रमाणे (मा. तहसिलदार यांचे डिजिटल स्वाक्षरीचे) ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला माहे जुन, 2024 पर्यंत संजय गांधी योजना शाखेत तहसिल कार्यालय, चिमूर येथे सादर करावे.