१ जुलै ला गुणवंत विद्यार्थी,उत्कृृृृष्ट अधिकारी व खेळाडूंचा सत्कार.. — नमो नमो मोर्चा भारत द्वारा आयोजन.. — राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांचा जन्मदिनाचे औचित्य…

 

      कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 पारशिवनी:- दिनांक 1 जुलै -2023 रोजी नमो नमो मोर्चा भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांच्या वाढदिवसाचे निमित्य साधुन अधिकारी,कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी,उत्कृष्ट खेळाडू,शिक्षक, प्रशिक्षक,समाजसेवी,पत्रकार यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          ग्रामीण भागातील समाजाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान,तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी,तसेच इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने संभारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

         मागील 2016 पासून नमो नमो मोर्चा भारत यांच्या विद्यमाने दरवर्षी असा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.यावर्षी सुध्दा 1 जूलैला सायं 4 वाजता शांती मंगल कार्यालय रामटेक येथे आयोजित करण्यात येणार आहे.

         या कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्रातील २०२३ मध्ये दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री. परशुरामजी खुने पद्मश्री पुरस्कृत भारत सरकार,सह उद्घाटक हेमंतजी नागपुरे उद्योजग तर विशेष अतिथी म्हणुन श्री. चन्द्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश,खासदार श्री. रामदासजी तडस वर्धा हे उपस्थित राहणार आहेत.

        कार्याक्रमाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मणजी मेहर (बाबूजी), वेसनमुक्ती महाराष्ट्र पुरस्कृत हे असतील,प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपुर,श्रीमती डॉ. माधवी खोडे़ अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर,श्री.डॉ.विपिन इटनकर जिल्हाधिकारी नागपूर,श्री. संजयजी पाटील अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे शाखा, नागपूर,श्रीमती.सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर,श्री सिद्धार्थजी गायकवाड प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर,श्रीमती संघमित्रा ढोके,उप संचालक नगर पालिका प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर,श्री.विशाल आनंद पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण,श्री पी. टी. देवतळे,उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय नागपूर,श्री.उल्लासजी नरड शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग,श्री.किशोरजी भोयर समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर, शश्रीमती वंदना सवरंगपते एसडीओ रामटेक,श्रीमती पल्लवी दिलीप राउत मुख्याधिकारी नगर परिषद रामटेक,श्री.हृदयनारायण यादव पोलिस निरीक्षक रामटेक,श्रीमती हंसा मोहने तहसीलदार रामटेक, श्री.जयसिंह जाधव गट विकास अधिकारी रामटेक, श्रीमती योगिता चाफले डी. वाय. एस. पी, गोंदिया हे उपस्थीत राहतील.

         कार्यक्रमाचे आयोजक एन.एन.एम.बी, फाउंडेशन (NNMB FOUNDATION) , श्री.अजय खेडकर,जिल्हा अध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढा़ओ,नमो नमो मोर्चा भारत,रामटेक-पारशिवनी तालुका पत्रकार संघ ,श्रीमती.कांचन माकडे,महिला जिल्हा अध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत हे आहेत.

         या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान आयोजकांनी केले आहे.