सुरजागड येथील लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकने एकाच कुटुंबातील तिघांचा घेतला जीव तर एक गंभीर… अजून किती जीव घेणार सुरजागड लोह प्रकल्प ?

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली –

           जिल्ह्यातील सूरजागड येथून चामोर्शी येथे लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत मार्कंडा (देव) येथील जनध्यालवार कुटुंबातील तीन जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. याशिवाय याच कुटुंबातील एक जण गंभीर जखमी आहे. तीनही मृतांसह गंभीर जखमी इसम एकाच दुचाकीने जात असताना हा अपघात घडला.

            प्राप्त माहितीनुसार, लॅायड्स मेटल्सच्या सुरजागड खाणीतून लोहखनिज घेऊन सीजी ०८, एयू ९०४५ क्रमांकाचा ट्रक येत होता. त्याचवेळी जनध्यालवार कुटुंबातील दोन महिला आणि एका बालकाला घेऊन नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे तहसील कार्यालयातून निघाले होते. ट्रक व दुचाकीची धडक झाली. यामुळे दुचाकीसह त्यावरील तिघे ट्रकखाली चेपल्या जाऊन फरफटत गेले तर बालक बाजुला फेकल्या गेला. या अपघातात प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) आणि रूद्र गणेश जनध्यालवार (५) यांचा जागीच मृत्यू झाला. नरेंद्र जनध्यालवार यांच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. सूरजागड खाणीतील लोह खनिज घेऊन जाणारे ट्रक नेहमी जीव घेत असतात त्यात ही पुन्हा भर.

अजून किती जीव घेणार सुरजागड प्रकल्पातील लोह खनिज?