धम्माचा गाभा आणि उज्वल भविष्य..

      वेदना आणि संवेदनांची सखोलता वेळेनुसार ठरत असते.

           प्रासंगिकता दोन्ही बाबींची ओळख निर्माण करीत नाही.कारण दु:ख म्हणजे नेमके काय?हे आत्तर व बाह्य मनाला समजून घेतल्याशिवाय कळत नाही.

       अर्थात संवेदना आणि वेदना या मनुष्य मात्रांच्या आयुष्याचा आधार असतात हे कळणे मनुष्य मात्रास आवश्यक आहे.

             वेदना आणि संवेदनांची ओळख झाली नाही किंवा ओळख निर्माण करून घेतली नाही तर दु:खांचा खरा गाभा कळणार नाही.

        आणि दुःखाचा वास्तव गाभा कळला नाही तर धम्म कळणार नाही.. तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे नेमके काय?हे मनुष्य मात्रास कळण्यासाठी आंत्तर आणि बाह्य मनाच्या जवळ जाणे अतिशय गरजेचे आहे.

         वरपांगी धम्माची परिभाषा जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे स्वत: बरोबर नागरिकांना मुळ तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्मांपासून दुर लोटने होय..

     जो विकारयुक्त असेल…

           आंत्तर व बाह्य मनातील विकार समजून घेतल्याशिवाय तथागत भगवान गौतम बुद्धांचा सर्व जनकल्याणकारी सद् धंम्म कसा बरं कळेल?

*****

               आपला नम्र

                    प्रदीप रामटेके

— मुख्य संपादक दखल न्यूज भारत…

— कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,”एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत..

— विदर्भ प्रदेश नागपूर विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई….