स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत पारशिवनी तालुक्यात आजपासून संजिवनी सप्ताहाला सुरुवात.. — 25 जून ते 1 जुलै 2023 पर्यंत असणार सप्ताह.

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत 25 जून ते 1 जुलै 2023 या कालावधीत राज्यात कृषी संजिवनी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. 

       त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात या सप्ताहात प्रत्येक दिवशी विशिष्ट मुद्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिने विवीध कार्यक्रमांचे घेण्यात येणार आहेत. 

        कृषी संजिवनी सप्ताहाची सांगता 1 जुलै 2023 रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच कृषी दिनी होणार आहे.

        यादृष्टीने पारशिवनी तालुक्यात कृषी संजिवनी सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.

       रविवार 25 जून रोजी कृषी पिक तंत्रज्ञान प्रसार दिन म्हणून पाळला जाईल,सोमवार 26 जून पौष्टिक आहार प्रसाद दिन, मंगलवार 27 जून कृषी महिला शेतकरी सन्मान दिन,बुधवार 28 जून जमीन सुपिकता जागृती दिन,गुरुवार 29 जून कृषी क्षेत्राची भावी दिशा,शुक्रवार 30 जून कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन तर 1 जुलै कृषी दिन असे पारशिवनी तालुक्यातील ग्रामस्तर,कन्हान,पारशिवनी मंडळ स्तर व तालुकास्तरावरील सप्ताहातील विविध कार्यक्रमांचे नियोजन आहे. 

        यामध्ये विवीध विषयांचे तज्ञ,कृषी विद्यापीठ,कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ,तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच प्रगतीशील शेतकरी,पिक स्पर्धा विजेते शेतकरी,कृषी क्षेत्राशी निगडीत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात येणार आहे. 

       करीता कृषी संजिवनी सप्ताहातील नियोजित कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन पारशिवनी तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी.गच्चे,मंडळ अधिकारी सुरज शेडे,मंडळ अधिकारी वाघ यांनी केले आहे..