आंदोलन करिता परिसरातील चौदा गावातील प्रमुखांची सभा…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली – 

काल दि . २२ सप्टेंबर २०२३ रोजी आदिवासी गोटुल भवन पोटेगाव येथे परिसरातील १४ गावातील प्रमुख व्यक्ती एकत्रित येऊन खालील विषयावरती चर्चा करण्यात आली.

 १) धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे सवलती व आरक्षणा बाबत सरकारच्या विरोधात १ ओक्टोम्बर २०२३ रोजी गडचिरोली येथे रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संखाने सहभागी होण्याबाबत.

 २) सरकारी शाळा प्रायव्हेट सेक्टर ला देण्याच्या सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात.

 ३) विविध पदभरतीच्या परीक्षेतील गैरव्यवहार आणि भ्रष्ठाचार विरोधात.

          इतर परिसरातील समस्यांवरती चर्चा करण्यात आली या प्रसंगी पोटेगाव परिसरातील (युवा सामाजिक कार्यकर्ते) विनोद मडावी , सनकु पोटावी मारदा, सुरेखा मडावी (सरपंच सावेला ) अशोक कुमरे युवा.सा. कार्य.जमगाव, देवराव हलामी युवा.सा. कार्य.काळशी, मधुकर परसा ग्रामसभा अध्यक्ष नागवेली , महेश हलामी ग्रामसभा सचिव नागवेली , शांताराम उसेंडीयुवा.सा. कार्य.देवापुर , पंकज तुमरेटी युवा.सा. कार्य.जाल्लेर , नागेश नरोटे युवा.सा. कार्य.जळगाव , धनराज कुळमेथे राजोली, साईनाथ रायसिडाम राजोली, कपिल नरोटे केळीगटा, इरफान खलको कोरकुटी, दिलासा किंडो कोरकुटी, राजेंद्र उसेंडी युवा.सा. कार्य.कन्हाळगाव, संतोष वड्डे ग्रामसभा अध्यक्ष तोहगाव, संदीप गोटा युवा.सा. कार्य. सावेला, बंडू पोटावी शाळा व्यवस्थापन समिती पोटेगाव, अमित नरोटे ग्रामसभा अध्यक्ष कोरकुटी आदी कार्यकर्ते मोट्या संख्येत उपस्थीत होते .