धर्म म्हणजे धारणा,धर्म म्हणजे मान्यता,धर्म म्हणजे आचरण,धर्म म्हणजे विश्वास,धर्म म्हणजे श्रद्धा,ही झाली धर्माची मूळ व्याख्या.
धर्माची दुसरी व्याख्या केली जाते,ती सद्विचार,सद्भावना,नैतिकता,सदव्यवहार,सुसंस्कार,संस्कृती म्हणजे धर्म.
या व्याख्येनुसार धर्माचे दोन प्रकार केल्या जातात,1 धर्म 2 अधर्म….
सद्विचार ,संस्कृती,नैतिकता,मर्यादा म्हणजे धर्म,आणि याविरुद्ध चे विचार आणि वर्तन म्हणजे अधर्म.उदा.विकृती,दुष्ट विचार,दूजाभाव,दुर्व्यवहार,दुष्ट नीती,अनीती,दुष्ट भावना म्हणजेच अधर्म.
धर्माची तिसरी व्याख्या अशी,सत्य न्याय नीती,दया क्षमा शांती म्हणजेच धर्म.हे विचार न पाळणे म्हणजे अधर्म होय.अन्याय अत्याचार,भ्रष्टाचार,काळाबाजार, नाशिलेबाजीच व्यवहार,शोषण,पिळवणूक,करणे म्हणजे अधर्म होय.नफा कमविणे,व्याज घेणे सुद्धा अधर्म होय.अर्थात नैतिकतेचा माप लावून केलेली ही धर्म अधर्माची व्याख्या आणि प्रकार होय.
माझ्या मते समतेचे विचार,आचरण,यावर श्रद्धा ठेवणे हाच खरा धर्म होय.आणि विषमता,भेदभाव,उच्चनीचतेचे विचार आणि व्यवहार म्हणजे अधर्म होय.
समतेशिवाय बंधुभाव नाही,समतेशिवाय स्वातंत्र्य नाही,समतेशिवाय न्याय पण नाही.समतेच्या विचारात आणि व्यवहारातच स्वातंत्र्य,समानता,बंधुभाव,न्याय ही मानवीमूल्य समाविष्ट आहेत.
विषमतेचे विचार,भावना,व्यवहार यात स्वातंत्र्य,समानता,बंधुभाव,न्याय या मूल्यांना स्थान नसते.विषमतेत दया,माया,क्षमा नसते,सत्य-न्याय-नीती नसते,विषमता ही फारच अक्राळ विक्राळ असते,ती भयानक असते,घातक असते.दुष्ट असते,लबाड असते.
माणसा माणसात भांडणे लावते.सख्या भावांना पक्के वैरी बनवते.विषमतेत विकृती आहे.द्वेष,मत्सर,दुष्ट भावना आहे.अहंकार आहे.अहंकारातूनच सत्ता संपती प्रतिष्ठेचा लोभ होतो,लोभापायी माणूस अनेक अन्याय अत्याचार,दुराचार,भ्रष्टाचार करायला लागतो.
अहंकाराला खतपाणी घालण्याचे काम हे विषमतावादी विचार,व्यवहार आणि व्यवस्था करीत असते.म्हणून म्हणावे लागते की,समता म्हणजेच धर्म आणि विषमता म्हणजेच अधर्म होय.
जगात अनेक पारंपरिक धर्म आहेत.परंतु सारेच माणसाला हितकारक आहेत असे नाही.धर्माचे हितकारक आणि हानिकारक असे दोन प्रकार करावे लागेल.ज्या धर्माचे विचार आणि आचरण समतेचे आहे,तेच धर्म माणसाचे हितकारक समजावे,आणि ज्या धर्माचे विचार आणि आचरण विषमतेचे आहे,ते धर्म हानिकारक समजावेत.
जो धर्म माणसात भेदभाव करतो,स्पृश्य अस्पृश्य असा भेद करतो,अनेक जाती निर्माण करून त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा फरक व भेद करतो,जो धर्म साऱ्यांनाच सारखी संधी देत नाही,सारखा दर्जा देत नाही,माणसाची अस्मिता,आत्मविश्वास,स्वावलंबन,स्वातंत्र्य,देत नाही.तो धर्म नसून अधर्मच होय.
हिंदुधर्मात ( वैदिक ब्राम्हण धर्म ) समता नाही,स्वातंत्र्य नाही,समान संधी नाही,माणसामाणसात भेद केल्या जातो,एकसंघ समाजाचे चार तुकडे करून त्यातील 85 टक्के लोकांना शूद्र अतिशूद्र आणि स्त्रीपुरूष भेदभाव केल्या जातो,त्यांना मानवी हक्क,जगण्याचा हक्क,संपती बाळगण्याचा हक्क,देवळात जाण्याचा,पाण्याचा,रोजगाराचा,सत्तेचा हक्क नाकारल्या जातो,त्यांना गुलाम केल्या जाते,दुय्यम नागरिक म्हणून त्यांच्याशी दुर्व्यवहार केल्या जातो,स्त्रीयांना तर अपवित्र,आणि उपभोगाचे साधन,गुलाम,समजल्या जाते.जिथे समतेला मुळीच थारा नाही.
रोटीबंदी बेटीबंदी करून जाती धर्मांना कुलूप घातल्या जाते.की जेणे करून आत कोंबलेली माणसे बाहेर जाऊ नयेत,आणि बाहेरील माणसे आत येऊ नये,असे धर्मांचे बंधन.व्यक्ती स्वातंत्र्याचा ज्या धर्मात ऱ्हास होतो असे धर्म नसून ते अधर्मच समजावे.
ज्या धर्मात समतेचे विचार आणि आचरण आहे,तेच धर्म माणसाच्या हिताचे समजावे.
हिंदुधर्मातील विषमतेने कहर केला,म्हणजे अन्याय अत्याचार केला,समतेची वागणूक ज्यांना मिळाली नाही.फक्त ब्राम्हण जातच शुद्ध पवित्र एकच वंशाची बाकी सर्वजाती या एकाच वंशाची नाहीत,संकरित आहेत,म्हणून ते अशुद्ध अपवित्र आहेत,म्हणून ते शूद्र आणि अतिशूद्र आहेत.म्हणून ते फक्त गुलाम म्हणूनच रहावे.ते कोणत्याही देशाचे क्षेत्राचे मालक होऊ शकत नाहीत.हा वंशवाद ज्या धर्मात आहे,तो धर्म मानवी हिताच्या आड येणारा आहे.
कारण प्रत्येकास आई आणि बाप असतोच,आई बापविना कुणीच जन्म घेऊ शकत नाही.मग ते आई बाप कोणत्याही वर्णाचे,जातीचे,रक्ताचे असोत.शेवटी सर्वांचे रक्त आणि मांसपेशी सारख्याच असतात,त्यात काहीच भेद नसतो.
जगी सर्व मानवजात एक आहे.शेवटी माणूस हा माणूसच असतो.तो पशु पक्षी वृक्ष नव्हे.विवाहप्रथा दृढ करायची आणि वंशवाद निर्माण करून माणसामाणसा त शुद्ध अशुद्ध,पवित्र अपवित्र,वरचा खालचा,बारामशी तेरामाशी असा भेदभाव करणे चुकीचे,शास्त्रीय,अवैज्ञानिक आहे.असे विचार म्हणजे प्रतिगामी विचार होत.
वंशवादातून वर्णभेदातूनच घराणेशाही,त्यातून जाती निर्माण झाल्या आणि विषमता प्रस्थापित झाली.ही जातीव्यवस्था,घराणेशाही,धर्म आणि त्यातील विषमता ही अखिल मानवजातीस प्रगतीत अडथळा ठरल्या,अजूनही अडचणच आहे.
ज्या धर्मात विषमता आहे,ज्या देशात जातीभेद आहे अशा देशाची एकता आणि अखंडता टिकणे शक्य नाही.कारण विषमतावादी धर्माने लोक अंधभक्त बनतात,त्यांच्या श्रद्धा डोळस नसतात.स्वर्ग,पुनर्जन्म,देव दैव ,पापपुण्य यांचेशी निगडित असतात.धर्मश्रद्धाळू लोक धर्मांध असतात.
त्यांचा कर्म ,प्रयत्न,आत्मविश्वास,धैर्य,पराक्रम,शोध ,नाविन्य यावर विश्वास नसतो,सत्य न्याय,नीती सर्व देवावर सोपवितात.करता करविता धनी तोच देव आहे,आपण फक्त निमित्तमात्र आहोत,या विचाराशी धर्मांध लोक ठाम असतात.
“ठेविले अनंते तैसेचि रहावे,काहीच न करता गप्प बसावे ” म्हणतात,
पण धर्माचा विषय आला की,रस्त्यावर मारामाऱ्या करायला तयार असतात.अशी दुटप्पी भूमिका श्रद्धावान लोकांची असते.हे अंधश्रद्धेचे बळी असतात.तर्क,पुरावे,अनुभव,इतिहास,शोध ,याचा हे विचार करीत नाहीत.
म्हणून अंधश्रद्धा आणि कर्मकांड या गोष्टी फोफावल्या आहेत.ज्या मानवी प्रगतीत अडथळा आहेत.एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत.
म्हणून जो धर्म स्त्रीयांना स्वातंत्र्य देत नाही,जो जातीभेद करतो,जे धर्म अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अडकून पडला आहे,माणसामाणसात भेदभाव करतो,गरीबी,जात याचे कारण मागच्या धर्मातील माणसाने केलेले पाप आहे,असे मानतो,असे धर्म माणसाच्या हिताचे नाहीत.
म्हणूनच नवे नवे धर्म निघाले उदा.बसवेश्वराने लिंगायत धर्म स्थापला.बुद्धाचा धम्म,चक्रधर स्वामीच्या महानुभाव पंथ,वारकऱ्यांचा भागवत धर्म,हल्लीचा शिव धर्म.हे सारे समतावादी धर्म, विषमता असलेल्या धर्मातून बाहेर पडले.
तरी देव भक्ती,आराधना, कर्मकांडात अडकून पडल्यामुळे जातीयता आणि धर्मांधता लोकांच्या डोक्यातून जायला तयारच नाही.
सारांश,धर्म हितकारक की अनहितकारक याचा विचार करूनच धर्माचे आचरण करावे.अन्यथा त्यापासून लांबच राहणे हितकारक असेल.



