Home Maharashtra गॅस बुकिंग करूनही मिळेना,पण बिना बुकिंग काळ्या बाजारात सहज उपलब्ध… —...

गॅस बुकिंग करूनही मिळेना,पण बिना बुकिंग काळ्या बाजारात सहज उपलब्ध… — ग्राहक त्रस्त…

 लक्षवेधी

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी – घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग करूनही 10-15 दिवस वाट पाहावी लागते,मात्र काळ्या बाजारात बिना बुकिंग लगेच सिलिंडर उपलब्ध होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

         ग्राहकांचे म्हणणे आहे की,ऑनलाईन किंवा फोनवरून बुकिंग केल्यावर “स्टॉक नाही”, “गाडी आली नाही” अशी कारणे देऊन टाळले जाते. पण एजन्सीच्या बाहेरच 100 ते 200 रुपये जास्त देऊन त्याच दिवशी बिना पावती सिलिंडर मिळतो.यावरून एजन्सी चालक व वितरकांच्या संगनमताने काळाबाजार होत असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.

        ग्राहक म्हणतात,”आम्ही रांगेत उभे राहतो, पण आम्हाला गॅस मिळत नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते जास्त पैसे देऊन लगेच घेऊन जातात.आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचा का?” असा संतप्त सवाल गृहिणींनी उपस्थित केला आहे.

        या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व गॅस एजन्सींची तपासणी करून काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.