शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.टेकेपार,रजि.नं.८११ च्या कार्यरत व्यवस्थापकाकडून पिक कर्ज देण्यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप सदस्य तथा शेतकरी श्री.भरत मळूजी पोहिनकर यांनी केला आहे.
संस्थेत गेल्या १० वर्षाहून जास्त शेतकरी नामे श्री.भरत मळूजी पोहिनकर मु.किटाडी (तू) पो. तळोधी (ना),ता. चिमूर, जि.चंद्रपूर याचे सभासदत्व आहे.
१२३/१ या ७/१२ वरील त्यांना दरवर्षी पीक कर्ज रक्कम सदूसष्ठ हजार (६७,०००रू) नेहमी प्रमाणे मिळत असायचे.त्याचप्रमाणे मागील २०२४ – २०२५ या वर्षी पीक कर्ज रक्क्म सदुसष्ठ हजार मिळाले होते.
पण २०२६ या चालू असलेल्या वर्षी पीक कर्ज रक्कम फक्त ३२ हजार मिळाले असून,संस्थेने कर्ज वाटप करतांना १२३/१ या ७/१२ मध्ये एकुण क्षेत्र १.७८ हे.आर असे क्षेत्रफळ असताना भरत पोहिनकर यांना अर्ध्या जमिनीवरील कर्ज द्यायला पाहिजे होते.
पण त्यांनी तसे न करता श्री.भरत मळूजी पोहिनकर यांचे मोठे भाऊ मयत असून त्यांचे नाव या ७/१२ वरती चढलेले आहे.
संस्थेतील व्यवस्थापक मंगेश मस्के,मनोहर गुळवे अध्यक्ष आ.वि.स.सं टेकेपार व रमेश भोयर उपाध्यक्ष (आ.वि.स. सं.टेकेपार) यांनी योग्यरित्या मागील कर्ज वाटप रक्कमेची पडताळणी न करता व १२३/१ या ७/१२ वर किती भाग पडतात याची पाहणी न करता त्यांनी भावाभावात १.७८ हे.आर या जमिनीत सारखे भाग करून कर्जे वाटप केलेले आहे.
आणि या सर्व प्रकरणाची पाहणी केली असता व्यवस्थापक-मंगेश मस्के म्हणतात की हे सर्व वरूनच हेड ऑफिस मधुन झालेले आहे.त्यांनीच आम्हाला सांगितलं की असे आराजी पाडायची.
पण त्यांना यासंदर्भात माहिती विचारली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा असे परिपत्रक अथवा जिआर उपलब्ध नसल्याचे सांगितले. श्रीरामे निरिक्षक आणि व्यवस्थापक हे एकमेकांचे नाव सांगतात आणि अध्यक्ष-मनोहर गुळवे यांना विचारला असता म्हणतात की मला याबद्दल काहिच जाणिव नाही.
सदर संस्थेत भोगळ कार्यभार चालत असून सभासदांची फसवणूक करतांना दिसून येते.म्हणजेच सामान्य शेतकरी-याला योग्य मार्गदर्शन न करता,त्याला स्वःताच्या दडपणाखाली ठेवण्याचे कार्य उपरोक्त व्यवस्थापक,अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करीत आहेत.
याचप्रमाणे यांच्या अनियमितते अंतर्गत कार्यपद्धत सुरू आहे असे शेतकरी श्री.भरत मळूजी पोहिनकर यांचे म्हणणे आहे.



