खंडाळा(डुमरी) येथून १४ बकरी-बकरे नेले चोरुन… — अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:- 

पारशिवनी पोलिस स्टेशन येथे अप क्र. /2024 कलम 379 भा.द.वि.अन्वये बकरी व बकरे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         तक्रारदार कोमल लखनलाल मेश्राम,वय 23 वर्ष, रा. खंडाळा (डुमरी) ता.पारशिवनी यांची तक्रारी वरून अज्ञात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मौजा खंडाळा (डुमरी) हे गाव पोलिस स्टेशन पासन पुर्वास 13 किमी अंतरावर आहे.

          आज शुक्रवारच्या पहाटे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरानी घराच्या समोरुनच खुल्या बका-याचे कोठेतून 04 बोकुड (एक कथीया,एक पांढरा, दोन काळे रंगाचे) प्रत्येकी किंमती 10000/-रू, प्रमाणे ४० हजार रुपये व 10 बकरी (04 काळ्या, 05 कथीया, व 01 पांढरी रंगाची) प्रत्येकी 7000/-रू अंदाजे असे ७० हजार रूपये,असा एकूण १ लाख,10, हजार/-रू किमतीचे बकरी-बकरे चोरून नेलल्याची घटना घडली.

       पो.नि.रविकांत थोरात यांचे मार्गदर्शनात पुढील तपास पारशिवनी पोलीस हे अज्ञात बकरी-बकरे चोरांचा शोध घेत आहेत.