११३ बटालियन तर्फे विश्वकर्मा जयंती साजरी…

 

भाविक करमनकर

धानोरा प्रतिनिधी

         धानोरा येथील सीआरपीएफ 113 बटालियनच्या वतीने धानोरा पोलीस स्टेशन मुख्यालयाच्या एमटी पार्क मध्ये 17 सप्टेंबर रोजी भगवान विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.

          यावेळेस केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त मंदिर परिसरात भजन कीर्तन व पूजा करण्यात आली त्यानंतर 113 बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांनी मंदिरात उपस्थित व बटालियन चे अधिकारी आणि जवानांना भगवान विश्वकर्मा यांच्या जीवनाची माहिती दिली.