जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर तालुक्यात दाखल तर   आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले स्वागत. 

नीरा नरसिंहपूर 

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यात प्रवेश केला असून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भवानीनगर येथे पालखीचे स्वागत केले. तुकाराम महाराजांची पालखी सणसर मुक्कामी असणार आहे.भवानीनगर कारखाना स्थळावर आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यामध्ये पालखी सोहळा तालुक्यात दाखल होताच आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखीचे सारथ्य करून पादुकांचे दर्शन घेतले.तसेच ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात वैष्णवांचे आदरातिथ्य होत होते.या पालखी सोहळ्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.पुरषोत्तम मोरे महाराजांसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.तसेच अनेक वारक-यांशी वारीच्या अनुभवासंदर्भात हितगुज केले.

यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी झाले असून जगाच्या पाठीवर सर्वात मोठा हा पालखी सोहळा असल्याची प्रचिती येत आहे.तसेच पालखीमध्ये लहान-लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत तसेच हजारो माता भगिनी विरूरायाच्या ओढीने देहभान विसरून चालत आहेत.त्यांच्या निरागस चेह-यावरील आनंद आणि समाधान पाहून आपले मन सुद्धा ख-या अर्थाने प्रफुल्लित होत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच वारीमध्ये चालत असताना वेळवेगळ्या भागातील अनेक वैष्णवांशी संवाद साधण्याचा योग आला असल्याचे आमदार भरणे म्हणाले.

तसेच इंदापूर तालुक्यामध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी केली असल्याने वारक-यांची कसलीही गैरसोय होणार नाही,याची काळजी घेतली असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.