एकोडी येथे मेरा माती मेरा देश उपक्रम साजरा…

 

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी ऋग्वेद येवले

 

साकोली:आज ग्रामपंचायत एकोडी मार्फत मेरी माती मेरा देश अभियानाअंतर्गत स्वच्छता ही सेवा व अमृत कलश हे उपक्रम राबविण्यात आले . त्यामनिमित्त कलशाचे रीतसर पूजन करून गावा शेजारील शेती मधून उपस्थित मान्यवरांच्या हातून त्या कलसामध्ये माती भरून ग्रामपंचायत मध्ये आणण्यात आले.

          त्याप्रसंगी उपस्थित एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, रिगन राऊत उपसरपंच, सर्व सदस्य वैभव खोब्रागडे , रहिलाताई कोचे, आशाताई बडवाईक, उपस्थित होते . त्याचप्रमाने भुरे ताई , नम्रता ताई मेश्राम,रजनी चचाने ताई, बेबी ताई वघारे अंगणवाडी सेविका , अंजुताई जांभूळकर सी. आर.पी. बचत गट ,अहिल्या ताई सोनकुसरे, गावातील युवा वर्ग , गावकरी मंडळी व ग्रापंचायत कर्मचारी उपस्थित होते .