चोख पोलीस बंदोबस्तात कोलारा ग्रामपंचायतचे तोडले आज कुलूप.. — प.स.चिमूरचे बिडिओ राजेश राठोड यांचे होते कुलूप तोडण्याचे तोंडी आदेश.. — गावाला पोलीस छावणीनीचे रुप..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

कोलारा वरुन थेट बातमीपत्र…

              दखल न्यूज भारतचे विशेष विभागीय प्रतिनिधी रामदास ठुसे यांनी चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा येथे आज मंगळवारला दुपारी भेट दिली असता मागील तीन दिवसांपासुन कोलारा येथील ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद अवस्थेत असल्याचे आढळून आले होते. 

           आज सायंकाळी ५.१० वाजता चिमूर पंचायत समितीचे बीडीओ राजेश राठोड यांच्या तोंडी आदेशावरून ग्रामसेवक राजेश ठाकरे व ग्रा.प.शिपाही शत्रुघ्न दडमल यांनी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ताला तोडला.

            दिनांक २७ ऑक्टोंबरला विशेष ग्रामसभा बोलावून समस्यांवर तोडगा काढणार असल्याचे नोटीस काढलेली असुन पोलिसांमार्फत गावात ध्वनीक्षेपका द्वारे माहिती देण्यात आली आहे.

          गावात पोलिसांचे दंगा पथक तैनात केले असुन पूर्ण कोलारा गावाला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले आहे.

          मौजा कोलारा येथे अनुचित घटना घडू नये म्हणून चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे यांचे मार्गदर्शनात चिमूर पोलीसांची कुमक कोलारा गावात बारीक लक्ष ठेऊन आहे.

          सध्यस्थितीत मौजा कोलारा येथे शांततामय वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे.