Home Social नवेगावखैरी पेच धरण चा पाणी साठा 90. टक्के पेक्षा अधिक…‌ —...

नवेगावखैरी पेच धरण चा पाणी साठा 90. टक्के पेक्षा अधिक…‌ — धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले…. — शेतकऱ्यांना व नागरिकांना सावधगिरीचा इशारा…

    कमलसिंह यादव…

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

        काल दि.16/09/2025 रोजी सायंकाळी 9.50 वाजता नवेगाव खैरी येथिल पेच प्रकल्पातील जलाशयची क्षमता 99..06% टक्के झाली होती.यामुळे सदर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले.

       तोतलाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग होत असुन,सध्या पेच प्रकल्पाच्या जलाशयाची क्षमता वाढली आहे.

      पाणलोट क्षेत्रात नैसर्गिक पाऊस पडत असल्यामुळे धरणात पाण्याचा येवा सुरु असुन जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे.पाण्याचा येवा पाहता पेच प्रकल्पाच्या मंजुर जलाशय प्रचलन आराखडा (ROS) विसाहर्ता नुसार दि. 16/09/2025 च्या रात्रि प्रयत प्राप्त झालेली रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत जलशयाची पातळी 85 % ठेवावी लागणार आहे.

      त्यामुळे धरणाच्या सुरक्षितते च्या दृष्टीने पेच प्रकल्पाच्या धरणातुन 8 आठ वक्रगेट व्दारे 253.472 क्युमेक पाणी सोडण्यात आले. 

    त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ नये या दृष्टीने आपल्या अधिनिस्त तालुक्यातील पेच नदी व कन्हान नदीच्या व नाल्याच्या काठावरील दोन्ही बाजुच्या तिरावरील गावातील नागरिकांना आपले गुरे ढोरे,घरगुती व शेती उपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी ठेवणे व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याबाबत आपल्या स्थरावरुन सुचना देण्यात याव्या अशी विनंती करण्यात आली आहे. 

     तसेच कन्हान नदी काठावरील गावांमध्ये वरील प्रमाणे दवंडी व्दारे जाहीर सुचना करण्याबाबत कार्यवाही महसूल स्तरावरुन करण्यात आली असून महसुल विभाग व तालुका आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिस पाटील तलाठी यांना सुचित करण्यात आले.

      नदी काठावर दोन्ही बाजुच्या तिरावरील गावातील नागरिकारनी व शेतकरी यांनी आपले गुरेढोरे घरगुती व शेती साहित्य साहित्य सुरक्षीत ठिकाणी ठेवावे असे आव्हान कार्यकारी अभियंता पेच पाटबंधारे विभाग नागपुर व पारशिवनी शाखा अभियंता यांनी केले आहे.