स्थागुशा ना. ग्रा. पथकाने आयसर वाहन पकडुन २५ गौवंश ला दिले जिवनदान…  — गौवंश २५ व आयसर वाहन असा एकुण १२ लाख ५० हजार रूपयांचा माल जप्त…

कमलसिंह यादव

प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत स्थागुशा नागपुर ग्रामिण पथकाने पेट्रोलिंग दरम्यान पोलीस कर्मचा-या सह तारसा रोडवर नाकाबंदी करित आयसर वाहनात २५ गोवंश क्रूरतेने कोंबुन भरून बेकायदेशीर कत्तली करिता वाहतुक करताना पकडुन गौवंश ला जिवनदान देऊन फरार दोन आरोपी विरूध्द कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. 

          सोमवार (दि.,१६) ऑक्टोबंरला पो.स्टे.कन्हान परिसरात स्थागुशा नागपुर ग्रामिण पथक पोलीस कर्म चा-या सह पेट्रोलिंग करित असताना मुखबिर द्वारे गुप्त खबर मिळाली की, एक आयसर वाहन क्र. सीजी – ०८- झेड -८७५२ या वाहनाने बेकायदेशीर गोवंशाना त्यांची चारा पाण्याची सोय न करता वाहनात कोंबुन कत्तली करिता तारसा रोडने नागपुर कडे नेत आहे.

        यामुळे पंच व पथकांचे मदतीने तारसा रोडवर नाकाबंदी केली असता वाहन चालक याने नाकाबंदी पाहुन अगो दर वाहन थांबवुन पळुन गेला. पंच व स्टाफ सह जाऊ न पाहणी केली तर एकुण २५ गोवंश क्रूरतेने कोंबुन बांधुन मिळुन आल्याने १) एक आयसर वाहन क्र.सी जी – ०८ – झेड – ८७५२ किमत १० लाख रुपये, २) २५ गोवंश किमत २ लाख ५० हजार रुपये असा एकुण १२ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गौवंशाची चारा पाण्यांची सोय व्हावी म्हणुन त्यांना खरबी भंडारा येथील गौ शाळा येथे पाठवुन २५ गौवंश ला जिवनदान देण्यात आले. कन्हान पोस्टे ला फरार आरोपी आयसर वाहन चालक व मालक यांचे विरुद्ध कलम ११(१)ड प्रा.स.का.५ (१)(ए) प्रा.नि.वा. का. अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपासा करिता पो.स्टे. कन्हान यांचे स्वाधिन करण्यात आले.  

          सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार (भा.पो.से.) तसेच अप्पर पोली स अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि बट्टुलाल पांडे, एएसआय नाना राऊत, हे कॉ विनोद काळे, ईकबाल शेख, प्रमोद भोयर, नापोशि वीरू नरड, संजय बरोदीया, चालक मोनु शुक्ला हयांनी यशस्वि रित्या पार पाडली.