आंनद नगर कन्हान येथुन ईको मारूती कार चोरी..

 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत आंनद नगर गहु हिवरा रोड चौक कन्हान येथे उभी असलेली ईको मारूती चारचाकी कार रात्रीला अज्ञात आरोपींने चोरी केल्याने फिर्यादीच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टेला गुन्हा दाखल केला आहे.

            कन्हान पोलीस कार चोरी प्रकरणी पुढील तपास करित असून आरोपीचा शोध घेत आहे. 

          आंनद नगर गहुहिवरा रोड,तारसा रोड चौक कन्हान येथील रहिवासी पंकज हेमराज रामटेके वय ४२ वर्ष याची ईको मारूती कंपनीची कार क्रं.एमएच-२६- व्ही ३९६२ असुन चेसीस न. एमए ३,इआरएलएफ-१५००१, ४६१८२ मॉडल नं.१६/०९/२०१०,किंमत ९० हजार रुपये ही गुरूवार (दि.१२) ऑक्टोंबरला रात्री ३ ते ४ वाजता सुमारास घरा जवळुन अज्ञात चोराने चोरी केल्याची कन्हान पोस्टेला फिर्यादी पंकज रामटेके यांनी तक्रार दिली.

         कन्हान पोलीस स्टेशन वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करून पुढील तपास हेकॉ नरेश श्रावणकर यांच्याकडे दिला आहे.