Home Maharashtra वाळूंची चोरटी वाहतूक करणारे ४० मोठी वाहने थांबवली,चिमूर येथील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना...

वाळूंची चोरटी वाहतूक करणारे ४० मोठी वाहने थांबवली,चिमूर येथील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली,पण अधिकारी घटनास्थळाकडे फिरकलेच नाही!… — ०३ करोड २६ लाख ४० हजार रुपयांचा महसूल एका रात्रीत चिमूरच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बुडविला,तो बुडवलेला महसूल कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वसूल करणे आवश्यक… — राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते महसूल वसूल करण्याचा मुद्दा रेटून धरणार!…

  रोखठोक 

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

      चिमूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांना,वाळू भरलेल्या ट्रक चालकाने ओवरटेक करुन मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना अत्यंत धक्कादायक होती,तसेच अंगावर काटे आणणारी होती असे जुनेद खान यांचे म्हणणे आहे.

        दिनांक १० एप्रिल २०२६ रोज शुक्रवारच्या रात्रोला ११ ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गाने वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने चिमूर शहरात ओवरटेक करुन जुनेद खान यांना मारण्याचा प्रयत्न करणारी धक्कादायक घटना घडली. 

                                 यानंतर जुनेद खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ट्रकचा पाठलाग करुन चिमूर पासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी पुलाजवळ थांबविले.( चिमूर पासून २ किलोमीटर अंतरावर लोखंडी पुल आहे.)

           यानंतर पाहता पाहता एकापाठोपाठ चोरटी वाळू वाहतूक करणारी ४० वाहने उभी झाली.यामध्ये ट्रक,हायवा,१२ चाकी वाहने होती.चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गावर उभी झालेल्या चाळीस चोरटी वाळू वाहतूक वाहनांच्या बाबतीत चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,चिमूर ठाणेदार दिनेश लबडे,यांना जुनेद खान यांनी भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली.

         माहिती देताच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी भरारी पथकाला आणि तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांच्या टिमला पाठवतो असे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांना सांगितले.

               बराच वेळ झाल्यानंतर सुध्दा भरारी पथक आणि तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांची टिम घटना स्थळावर दाखल झाली नसल्याने परत जुनेद खान यांनी,”चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने व चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय.

      परंतु सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल बंद करुन ठेवले असल्याचे जुनेद खान यांच्या लक्षात आले.

       तद्वतच अवैध वाळू वाहतूकी बाबत,अवैध वाळू उत्खननाबाबत आणि अवैध मूरुम उत्खननाबाबत चिमूर येथील स्थानिक अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली की,लगेच त्यांचे मोबाईल बंद होत असल्याच्या प्रकार यापूर्वी सुध्दा घडलेला आहे.

                 फोन बंद करुन,”अवैधपणे वाळू व मूरुम या खनिज संपत्तीचे उत्खनन होऊ देणे,वाळू व मूरुम खनीज संपंतीची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होऊ देणे,आणि वाळू व मूरुम अवैध उत्खननाबाबत सातत्याने दुर्लक्ष करणे,पत्रकारांनी वाळू व मूरुम अवैध उत्खननाबाबत पोलखोल केली तर पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे,हा नवीनच फंडा चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी सुरू केला असल्याचेही दिसून आले आहे.

         अश्या प्रकारचा,चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर आणि अन्यायकारक फंडा सुरु करणे म्हणजे,”मोठ्या प्रमाणात अवैध वाळू व मूरुम उत्खननाद्वारे आणि त्यातंर्गत चोरट्या वाहतूकी द्वारे,खरोबो रुपयांच्या भ्रष्ट्राचाराला त्यांच्याकडून चालना देणे होय व वाळू आणि मूरुम माफीयांना संरक्षण देणे होय.

       अवैध वाळू व मूरुम उत्खननाकडे व चोरट्या वाळू व मूरुम वाहतूकीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत,”खरबो रुपयांचा महसूल बुडविला असल्याचे दिसून येत आहे.

        यामुळे चिमूर तालुक्यातील खनीज संपंतीच्या चोरी अंतर्गत खरबो रुपयांचा भ्रष्ट्राचारात कोणकोण गुंतले आहेत,यांची चौकशी महाराष्ट्र सरकारने करणे आवश्यक झाले आहे.

 जुनेद खान यांची हिम्मत कौतुकास्पद…..

     दिनांक १० एप्रिल २०२६ रो शुक्रवारच्या रात्रोला साडे-अकरा ते १२ वाजताच्या दरम्यान वाळूची चोरटी वाहतूक करणारी ४० वाहणे चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी पुलाजवळ उभी केली.ही त्यांची हिंमत खरोखरच कौतुकास्पद आहे.

         मात्र,चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना,”वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांना थांबवले असल्याची माहिती जुनेद खान यांनी देताच,संबंधित अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद केले असल्याचे जुनेद खान यांच्या लक्षात आले.

       यामुळे नाईलाजास्तव वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाहने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांनी जावू दिले.

लाफरवाई अंतर्गत करोडो रुपयांचा बुडवलेला महसूल संबंधित अधिकाऱ्यांच्या चल-अचल संपंतीमधून वसूल करायला हवे!…..

      राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांना थांबवले असल्याची माहिती चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांना दिल्यानंतर सुध्दा,त्यांनी मौका स्थळावर आपल्या ताफ्यासह जाण्याची तसदी घेतली नाही.त्यांनी सरळ सरळ आपल्या कर्तव्यात जाणिवपूर्वक लापरवाही केली.

         चिमूर उपविभागीय अधिकारी,चिमूर तहसीलदार,चिमूर ठाणेदार यांनी बोलल्याप्रमाणे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक,हायवा,१२ चाकी वाहनांना जप्त करण्याची कारवाई करण्यास कुचराई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर, जुनेद खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी,वाळू भरलेल्या वाहनांना जावू दिले.हे संबंधित चिमूर येथील अधिकाऱ्यांच्या लापरवाहीचे ज्वलंत आणि ताजे उदाहरण आहे.

       मात्र,४० मोठी वाहणे म्हणजे एका वाहनातून ८ ते १२ ब्रास वाळूची चोरटी वाहतूक दिनांक ११ एप्रिल २०२६ ला केली गेली.सरासरी एका वाहनात ८ ब्रास वाळू पकडली तरी ४० वाहनात सरासरी ३२० ब्रास वाळू होती असे गृहीत धरले पाहिजे.

     प्रत्येक वाळू ब्रास मागे १ लाख २० हजार रुपयांच्या दंडाची रक्कम आकारली जाते.यामुळे ३२० ब्रास वाळू मागे दंडाची रक्कम ३ करोड २६ लाख ४० हजार रुपये होतय. 

       उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,चिमूर ठाणेदार दिनेश लबडे यांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारे ४० वाहने ताब्यात घेण्याची कारवाई केली नसल्याने आणि आपले फोन बंद करुन ठेवले असल्याने,एका रात्रीत त्यांनी ३ करोड २६ लाख ४० हजार रुपयांचा शासनाचा महसूल बुडविला आहे.

          यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांच्या चल-अचल संपंतीमधून ३ करोड २६ लाख ४० हजार रुपयांच्या महसूलाची वसूली महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे,असे मत जुनेद खान यांच्यासह चिमूर तालुक्यातील नागरिकांचे आहे.