विकसित युवक – विकसित भारत व मतदार जनजागृती अभियान उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण श्रम संस्कार शिबिराला सुरुवात..

    रोहन आदेवार

सहायक जिल्हा प्रतिनिधी

       यवतमाळ/वर्धा..

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,संलग्नित आर.टी.एम.टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी संचालित कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा.”विकसित युवक- विकसित भारत’ व मतदार जनजागृती अभिमान या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण श्रम संस्कार शिबिराचे दि.०९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

       सदर शिबिराचे उद्घाटन दि.०९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश कुंभलकर संचालक आर.टी. एम. टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी नागपूर, कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते भूषण पारटकर,तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ.चंदू पोपटकर (प्राचार्य कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा), स्मिताताई पारटकर(सरपंच,झडशी टाकळी), प्रशांत सावरकर (अध्यक्ष लक्ष्मीमाता मंदिर प्रतिष्ठान टाकळी),नथुजी नान्हे (सचिव लक्ष्मीमाता मंदिर प्रतिष्ठान टाकळी), अश्विनीताई शिवरकर (उपसरपंच टाकळी), मानिषाताई सेलोटे(पोलीस पाटील टाकळी) तसेच समस्थ गावकरी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कुंभलकर यांनी शिबीरा संदर्भात माहिती दिली व विद्यार्थी जीवनात शिबिराचे काय महत्त्व असते समजावून सांगितले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक भूषण पारटकर यांनी गावात विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या आल्यास किंवा मदत लागल्यास सांगा आम्ही सढळ हाताने मदत करू असे सांगितले. तसेच प्रा.डॉ.चंदू पोपटकर सरांनी सजीवसृष्टी व ग्रामीण विकास यांच्याशी एकरूप होऊन विद्यार्थ्याला ग्रामीण विकासाचा एक हिस्सा बनवून देशाचा विकास करणे हा उद्देश घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,अशी भूमिका व्यक्त केली.

          राष्ट्रीय सेवा योजना स्थापनेच्या इतिहास व वाटचाल याबद्दलचा मागोवा घेत,सदर राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन व अध्यापन या चौकटीच्या बाहेर येऊन सामाजिक भान व जाणिवेचे धडे देखील गिरवले जातील अशी आशा व्यक्त करत,महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचे व स्वयंसेवकांचे कौतुक देखील केली केले.

      सदर शिबिराच्या उद्घाटनानंतर कार्यक्रमाधिकारी अशोक सातपुते सर यांनी प्रास्ताविकेतून शिबिरामध्ये राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण, शिक्षण, मतदार जनजागृती, योगाभ्यास, नैसर्गिक संसाधन व संवर्धन,ग्राम स्वच्छता, सर्वांगीण ग्रामीण विकास, आपत्ती व्यवस्थापन, पशुरोग निदान, बालविवाह, रस्ता सुरक्षा, तृणधान्य आहार महत्त्व, निरनिराळे सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रम याविषयी विस्तृत अशी माहिती देत त्याची उपयोगिता व महत्त्व विशद केले.

        या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भारती शेळके तर आभार समीक्षा पाटील या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सतीश धवड,डॉ. महादेव चुंचे, प्रा. विशाखा मानकर, प्रा.विलास बैले, डॉ. सुनील तोतडे व श्री.रवींद्र वाडेकर उपस्थित होते.

  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिबीर उद्घाटन कार्यक्रमासाठी सहकार्य केले.