ब्रेकिंग न्युज… — दर्यापूर ते दहीहांडा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी अखेर आमरण उपोषनाला सुरवात.‌‌.‌ — सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र गार झोपेत.‌.

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक 

        दर्यापूर तालुक्‍यातील दर्यापूर ते दहीहांडा या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे व डांबरीकरणाचे काम करण्यात यावे,या मागणीसाठी नांदरून येथील सामाजिक कार्यकर्ते चंदू रायबोले यांनी दि १२ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणला सुरूवात केली आहे.

          अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले होते कि येत्या १० दिवसात रोडचे काम चालू करण्यात आले नाही तर आमरण उपोषण करण्यात येणार असा इशारा देण्यात आला होता.

           पंधरा दिवसापासून प्रशासनाकडून कुठलीच दखल न घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांच्या गलथान कारभाराच्या विरोधात नांदरुन येथील सामाजिक कार्यकर्ते चंदू रायबोले यांनी दर्यापूर ते दहीहांडा रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणला सुरवात केली आहे.

       या रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून या रस्त्यावर दररोज अपघात घडत आहेत.मात्र,बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून या रस्त्या संदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही असे दिसून आले आहे,ही अत्यंत वाईट बाब असल्याचे मत उपोषणकर्त्यांचे आहे.

          या रस्त्यावर दर दोन दिवसाला अपघात होत आहे.या होणाऱ्या अपघातांमुळे येणाऱ्या काळात कोणाचा मृत्यू झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची राहील व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशाराही उपोषणकर्त्यां कडून देण्यात आला आहे.

          उपोषण मंडपाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविलेली होती.अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कामाला सुरवात करावी अशी मागणी उपोषण मंडपातील नागरिकांनी केली आहे.

**

प्रतिक्रिया..

    दर्यापूर ते दहीहांडा रोड नूतनीकरणं करण्याकरिता मागणी केलेली आहे.पण आज रोजी वार्षिक जो निधी असतो त्या निधी मधून रस्त्याच्या डागडुजीचे काम उद्या पासून चालू होईल.दर्यापूर ते सिमारेषेपर्यंत करण्यात येईल.

        प्रतिक गिरी

कार्यकारी अभियंता,दर्यापूर 

**

बाॅक्स..

    दर सहा महिन्याला दर्यापूर ते दहीहांडा रोडचे डागडुजी चे काम केल्या जाते.डागडुजी केल्या नंतर एका महिन्यानंतर रोड पुन्हा जैसेथेच होतो आहे.रोडचे डागडुजी केल्या जाते की मलाई खाण्याचा काम केल्या जाते हेच कळत नाही.‌

 चंदूभाऊ रायबोले

  उपोषणकर्ते