Home Social स्मृतिशेष शिक्षण महर्षी प्राचार्य,स्व.रमेशचंद्र मुनघाटे यांना विनम्र अभिवादन…

स्मृतिशेष शिक्षण महर्षी प्राचार्य,स्व.रमेशचंद्र मुनघाटे यांना विनम्र अभिवादन…

भाविकदास करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

 श्री.जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे स्मृतीशेष प्राचार्य स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पंकज चौहान होते मांचावर प्रा.डॉ. विना जांबेवार, प्रा.डॉ.हरिष लांजेवार, प्रा. डॉ.राजु किरमिरे, प्रा. डॉ.पंढरी वाघ, प्रा.डॉ. दामोधर झाडें यांची प्रमुख उपस्थिती होती.

          कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांनी प्रतिमेला माल्यार्पण केले तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा फुले अर्पण करून अभिवादन केले.

          या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य पंकज चौहान यांनी स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला तसेच या दिवसाचे औचित्य साधून धानोरा येथील ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

          कार्यक्रम प्रसंगी उद्योगपती रतन टाटा यांचे दुःखद निधन झाल्यामुळे दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. ज्ञानेश बनसोड, प्रा. नितेश पुंन्यप्रेडडीवर, प्रा. मानतेश तोंडरे , प्रा. भैसारे मॅडम , प्रा. डॉ.प्रियंका पठाडे , प्रा.डॉ.प्रवीण गोहणे, प्रा.डॉ. धवणकर, प्रा. डॉ. गणेश चुदरी, प्रा. प्रशांत वाळके, प्रा. डॉ. संजय मुरकुटे, प्रा.कैलास खोब्रागडे, प्रा. निवेदिता वटक, प्रा.करमनकर, प्रा. रणदिवे, प्रा.आवारी शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्राध्यापिका गीतांचंद्र भैसारे यांनी मानले.