ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : सावेला ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा व कोंडवाडा रक्षक पदासाठी 10 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये ग्रामसेवक शिवणकर यांनी कोणतीही पारदर्शकता न ठेवता, निकषाचे पालन न करता परीक्षा घेतल्याने आझाद समाज पार्टीचे कार्याध्यक्ष विनोद मडावी आणि या पदभरतील उमेदवार तसेच गावकरी मंडळी यांनी या पदभरतीवर आक्षेप घेत ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
परीक्षा घेताना विविध डिपार्टमेंट कडून 10-10 प्रश्न घ्यायचे असतात ते घेण्यात आले नाही, ग्रामसेवकांने कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला विश्वासात न घेता परस्पर पेपर काढले, मुलांना पेपर देताना पेपर सील नव्हते, परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षक नाही, हवालदार नाही आणि एका अशा विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. ज्याचा शिक्षणाशी संबंध तुटला आहे आणि जे विद्यार्थी रेगुलर आहेत ते बाद झाले. सदर प्रकरण हे संशयास्पद असून यामध्ये घोळ झाल्याचे चित्र उघडं झाले आहे.
त्यामुळे आझाद समाज पार्टीने व गावाकऱ्यांनी सदर परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्यावी आणि दोषी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी गट विकास अधिकारी यांचेकडे केली.
यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार व गावातील परीक्षार्थी उपस्थित होते.



