Home Maharashtra वाघाच्या हल्यात तीन गायीचा मुत्यु… — दोन गायी गंभीर.. जख्मी.. ...

वाघाच्या हल्यात तीन गायीचा मुत्यु… — दोन गायी गंभीर.. जख्मी.. — सिहोरा येथे वाघाचा धुमाकुळाने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान :-  नगरपरिषद अंतर्गत कन्हान नदी काठा लगतच्या सिहोरा गावाजवळ आज गुरुवारी पहाटेच्या दरम्यान वाघाने हल्ला करून खुट्याला बांधलेल्या गायावर हल्ला केला व तिन गायांचा फाडसा पाडला तर दोन गायींना गंभीर केले असल्याची घटना घडली.

      या घटनेमुळे परिसरातिल ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मागील चार दिवसापासुन वाघ आणि बिट्याचे धुमाकुळाने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

            गुरूवार (दि.१०) ऑक्टोंबरलाला पहाटेच्या दरम्यान सिहोरा शेत परिसरात वाघ आढळल्याची वन विभागाला व पोलीस विभागाला नागरिकांना सुचना दिल्यानंतर त्यांनी सावध राहण्याचे आवाहन केले होते.  

      सिहोराच्या कन्हान नदी काठा लगत सिहोरा कंपनीच्या मोकळ्या जागेतील झुडपी जंगलात गावाजवळ काही अंतरावर पहाटे ४.०० वाजताच्या दरम्यान वाघाने पांच गयींवर हल्ला करून तीन गाई मारले तर दोन गायींना जख्मी केले.

      वाघाने हल्ला करून पशु मालक धर्मराज ठकरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.

      घटनास्थळी आरफओ ए.बी. भगत,वनपाल बी.डी.वरखडे,सिहोरा परिक्षेत्र वनरक्षक,सिहोरा वनरक्षक एन.के.मेश्राम,पटगोवरी वनरक्षक सतिश वासनिक,वनमजुर म्हैसुर भोंडेकर,धापडे वनरक्षक,वैशाली ठाकुर वनरक्षक,रेखा तेढे,वनरक्षक चांदेकर,वनरक्षक खापडे,वनरक्षक,नान्हे मँडम वनरक्षक,राऊत मॅडम वनरक्षक,वनमजुर रूपचंद बिलोने,फुलचंद,भलावी,लोढे सह व्याग्रमित्र शेखर बोरकर ह्यांनी पेहचुन  धटनास्थळाचा पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर भदाने यांनी मृत गाईचे शवविच्छेदन केले.

      याचबरोबर जखमी गायीवर उपचार सुरू आहेत.