Home देशविदेश एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी RSS मनुवाद्याना धूळ चारली…. — आम्ही त्यांचे...

एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी RSS मनुवाद्याना धूळ चारली…. — आम्ही त्यांचे अंधभक्त मात्र षंढ म्हणून निपजलो…. — थू!,आमच्या (प्रथम अनंत भवरेच्या) जिंदगानीवर…..

एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी RSS मनुवाद्याना धूळ चारली….

— आम्ही त्यांचे अंधभक्त मात्र षंढ म्हणून निपजलो….

— थू!,आमच्या (प्रथम अनंत भवरेच्या) जिंदगानीवर…..

    हरियाणाचा मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणतो काय……

     डरने की कोई बात नही, हमारेपास सारी व्यवस्थाए है,हमने सारा इंतेजाम करके रखा है, छत्तीसगड मे जैसे हुआ वैसेही यहाँ होगा,जब 8 तारीख को EVM खुलेगी, तब काँग्रेस रोएगी.और कहेगी की, EVM ने इनको जिताया है…. “

आणि अगदी तेच होते काय?

    आता आमचा देवेंद्र फसणवीस याने सुतोवाच केले की, ” हरियाणा पॅटर्न ” महाराष्ट्रात होईल…..!

याचा अर्थ काय?

      एकदा एक वाटसरू प्रखर उन्हात चालून चालून दमला.आणि एका मोठ्या कल्पवृक्षाखाली थंड सावलीला विसावा म्हणून बसला.तेवढ्यात त्याने मनोमन ईच्छा व्यक्त केली की,थंडगार पाणि जर प्यायला मिळालं तर बरे होईल….

      ताबडतोब त्याच्यासमोर थंड पाण्याचा माट आला. पोटभर पाणि पिऊन तृप्त झाला.लगेच त्याने मनोमन कल्पना केली की,प्रचंड भूक लागलेली आहे,जेवण मिळालं तर बरे होईल…..

      ताबडतोब पंचपक्वानाचं ताट उपलब्ध झालं.मनसोक्त जेवल्यावर त्याने कल्पना केली की,झोपायला बाज जर असली तरी किती बरे होईल…..

      तेवढ्यात मखमली पलंग उपलब्ध झाला.आणि त्यावर तो गाढ झोपी गेला…..

     जेंव्हा तो झोपेतून जागा झाला,तेंव्हा त्याने स्वतःलाच प्रश्न केला की, इथे काहीही नसताना मला सर्व मिळाले…..

     या झाडावर भूत तर नाही ना….

  ताबडतोब भुतही त्याच्यासमोर उभे राहिले…..!

तो मनातच भीत भीत म्हणाला, मला खाणार तर नाही ना?

   भुताने ताबडतोब खाऊनही टाकले..

     अशीच अवस्था आमची ( संविधानवादी ) झालेली आहे. याला जबाबदार प्रथम मीच आहे नंतर कदाचित इतर असतील……

     कारण मी ( अनंत भवरे ) आम्ही संविधानातील आरक्षणाचा लाभ घेऊन पोट तुडुंब भरल्यामुळे ढेकर देण्यातच 75 वर्षे घातली.आणि आता जेंव्हा जाग आली RSS चं भूत मला ( आम्हाला ) खाण्यासाठी उभे राहिले आहे.

       या EVM भुताने ( RSS ची निर्मिती ) प्रथम छ्तीसगड, लोकसभा,हरियाणा आता यानंतर महाराष्ट्राची तयारी केलेली आहे.त्याचे सुतोवाच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी दिलेलेच आहेत.म्हणूनच की काय शिंदे व अजित पवार यांची फोडाफोडी उद्धव व शरद पवार यांची राजकीय कोंडी करण्यासाठी झाली होती.ही शंका येत आहे.तरी अजूनही या महाराष्ट्राच्या चाणक्याला अक्कल आलेली दिसत नाही,की EVM म्हणजेच भाजप आणि RSS आहे ते….

         असो EVM ही समस्या जरी विरोधी पक्षांची असली, त्यांना अजूनही अक्कल येत नसली, तरी त्यांच्यासाठी मुद्दा हा गौण आहे का प्रधान आहे इथे त्यांचा प्रश्न नाहीच..

      इथे प्रश्न हा आमच्याशी ( भारतीय जनतेशी ) संबंधित आहे. कारण संविधान हे जनतेसाठी लिहिले आहे.कोण्या एका धर्मासाठी किंवा विशिष्ट जातीसाठी नाही.त्यातील उद्देशिका केवळ भारतीय जनतेलाच आव्हान करते आहे. की, “आम्ही भारताचे लोक…..

     स्वताप्रत अर्पण करत आहोत.”इथे राजकारण्यांचा किंवा राजकीय पक्षांचा संबंध येतोच कुठे?

            गेल्या 2014 पासून RSS मोदी – शहाने देशाला काट्यानेच काटा काढण्याचे षडयंत्र चालविले आहे.सुरुवातीला NI ( Nation Investigation ) CBI ( Central Buro of Investigation ) IT ( Income Tax ) यांना म्हणजेच सनदी नोकरशहाना कुत्रे बनवून काँग्रेस व इतर विरोधी प्रादेशिक लहान मोठ्या पक्षावर टार्गेट करुन सोडले.

         त्यानंतर न्यायपालिका,पत्रकारिता यांना आपले ताटाखालचे मांजर बनवले. शेवटी या सर्वांच्या मदतीने EVM भुताच्या माध्यमातून भारतीय जनतेला टार्गेट केले…..

     बिचारी जनता कुणीही हाका,कुणीही पिटा,गुमान गुलाम होऊन सहन करणारी.कारण 5000 वर्षांच्या कुसांस्कृतिक गुलामीच्या इतिहासात 75 वर्षांच्या क्रांतीने काय बदल होणार आहेत?समुद्रातून एक हंडाभर पाणी काढण्यासारखे आहे!

        अशा वळणावर आम्ही ( भारतीय जनता ) येऊन ठेपलेलो आहोत की,अजूनही आम्ही या RSS वादी EVM भुताचा गांभीर्याने विचार करुन दखल घेऊ शकत नाही.उलट स्वतःला आणि इतरांना हा प्रश्न करतो की,काँग्रेसला कळायला पाहिजे,महाविकास आघाडीला,इंडिया आघाडीला कळायला पाहिजे.असं म्हणून आम्ही गप्प बसतो.अरे पण ही महागाई, बेरोजगारी,दंगलीचे परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागतात,कोणत्याही राजकारण्याला किंवा राजकीय पक्षाला नाही.एकनाथ शिंदे,अजित पवार,देवेंद्र फसणवीस ही असंविधानिक सरकारचे नेतेमंडळी लाडक्या बहिणीची दरमहा ( केवळ निवडणुकीपर्यंतच ) 1500/- ची केलेली बोळवण जणूकांही स्वतःच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या संपतीच्या शपथपत्रातील संपत्तीतून दिलेली आहे.असा अविर्भाव आणतात!

       इकडे 1500/- दिले आणि तिकडे 100च्या ऐवजी 500 चा मुद्रांक केला,त्याचप्रमाणे खाद्यपदार्थाची ड्युटी 20 % वाढवली!

         म्हणजे सर्वकाही आम्हालाच ( भारतीय जनतेलाच ) भोगावे लागणार आहे.जर हे सर्व आम्हालाच भोगावे लागणार असेल तर आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी राजकीय पक्षांकडे केविलवाण्या नजरा आम्ही का वळवायच्या.?

       अरे जेंव्हा फ्रेंच राज्य्क्रांतीत सर्वसामान्य 95 % जनता एकवटली आणि त्यांच्यासोबत मोन्टेस्की्यू,रुसो,व्हालटेअर,दिदेरो सारखे विचारवंत सोबत होते.म्हणून ती यशस्वी होऊ शकली.तर आज आमच्यासोबत कुणी जागृत विचारवंत आणि आचारवंत जरी नसला,तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतेच्या प्रतिभेतून साकारलेले संविधान तर आहे ना.

     आणि याच संविधानाने प्रदान केलेल्या मूलभूत हक्कातून आम्ही जागृत नाही झालो तर गुलामी ठरलेली आहे.आणि याच मूलभूत हक्कातील सर्वश्रेष्ठ हक्क म्हणजे मताचा अधीकार…

      आणि हाच अधिकार जनतेकडून हिरावून घेण्यासाठी RSS ने सर्व शक्ती पणाला लावली.जी आज यशस्वी होताना दिसत आहे.ज्या EVM ला अनुभव घेऊन सर्व लोकशाहीवादी जगाने लाथाडले.तीच्यावरच निवडणुका घेण्याचा आमच्या मुख्य निवडणूक आयोगाचा अट्टाहास का..?

     याचे उत्तर एक आणि एकच ते म्हणजे 2025 च्या हिंदू महासभेच्या शतकपूर्तीची RSS ची तयारी….

        प्रश्न हा आहे की निदान महाराष्ट्रियन जनतेने तरी तो सहन करायचा का? ज्या महाराष्ट्राने देशाला,जगाला,मानवतेसाठी महापुरुषांची खाण निर्माण केली. तीच महाराष्ट्रीयन जनता या EVM वर निवडणुका होऊ देणार का? 

      मी तरी त्यासाठी सर्वकाही करणार आहे…….

  आपण?

नाहीतर ‘थू ‘ माझ्या जिंदगानीवर…..

              आवाहनकर्ता

            अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..