उमेश कांबळे ता प्र भद्रावती
सध्या भद्रावती तालुक्यात अवैध धंद्याला चांगलाच ऊत आला असुन स्थानिक प्रशासन साखर झोपेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
चंद्रपुर जिल्हा हा ब्लैक गोल्ड सिटी म्हनुन ओडख आहे आणि याच जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील खनिज संपत्तिची चोरी करुन अवैध कोळसा उत्खनन करण्याचे काम एम्टा च्या कोळसा खदानीतुन कित्येक वर्षापासुन सुरु असुन कोळसा चोरीची तस्करी होत असुन स्थानिक ट्रांसपोर्ट कंपन्याची मलाई खाने सुरु असुन महसूल विभागाचा महसूल बुडावित आहे. तालुक्यातून चंद्रपुर नागपुर या महामार्गाने भद्रावती वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात धुर झोकुन न भिता न जुमानता है दूचाकीस्वार आपल्या एका दूचाकी वर कमित कमी ६ ते ७ बोरी अशा एकुन १० ते १५ दूचाकी भर दिवसा कोळसाचोरी तस्करी ची शोभा यात्रा चपराळा, घोट निंबाळा, चालबर्डी, लोनारा,घोडपेठ तेलवासा, ढोरवासा व माजरी या मार्गाने करत नेतात. हे कुणाच्या आशीर्वादाने? महसूल विभाग की पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष ? आज दूचाकी वरून कोळसा तस्करी करणारे समोर ट्रांसपोर्ट चे मालक बनुन हायवा ने तस्करी करायला वेड लागणार नाही,यात प्रशासनाचे महसूल बुडत राहिल आणि पोलिस प्रशासन साखर झोपेत राहिल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.