गेल्या 3 दिवसापूर्वी बांगलादेशात प्रथम विद्यार्थ्यांनी त्यानंतर जनतेने रस्त्यावर उतरून व्यवस्थेविरुद्ध उठाव केला.त्या विरुद्ध प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला.लष्कराने तो अमान्य करून गोळीबार करण्यास नकार दिला.ही घटना 21 व्या शतकात घडू शकते, याचे आश्चर्य वाटले.कारण 18 व्या शतकात फ्रांसमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीत 16 व्या लुईने असाच आदेश दिल्यावर लष्कराने गोळीबारास नकार दिला होता.अशीच घटना 21 व्या शतकात आशिया खंडात तेही भारताच्या शेजारील देशात घडू शकते. याचे आश्चर्य वाटते..
कोणत्याही युद्धाला, महायुद्धाला,विरोधाला,आंदोलनाला,मुख्यत्वे दोन कारणे असतात.एक तात्कालिक कारण दुसरे जनतेच्या मनात खदखदत असलेला राज्यकर्त्याविरुद्धचा असंतोष.
ज्याप्रमाणे पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण,आर्कड्यूक फर्डिंनंड या राजपूत्राचीहत्या कारणीभूत झाली.परंतू युरोप मधील साम्राज्यवादाची स्पर्धा त्याला खरे कारण होती.
तसेच दुसऱ्या महायुद्धाचे तात्कालिक कारण म्हणजे,जर्मनीने अर्थात हिटलरने पोलंडवर आक्रमण केले म्हणून नव्हे तर,जर्मनीचा पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रानी केलेल्या अपमानाच्या सुडाचा बदला घेणे हे खरे कारण होते…
फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी जनतेनी आम्हाला भाकरी द्या म्हणून राजवाड्यावर काढलेला मोर्चा हे तात्कालिक कारण होते.
तर खरे कारण हे होते की गेल्या पाऊणे दोनशे वर्षांपासून ब्युर्बोण घराण्याच्या राजेशाहीतील राज्यकारभारामुळे फ्रांसमध्ये निर्माण झालेल्या गरीब-श्रीमंतीच्या कृत्रिम दरीतून बाहेर पडलेला लाव्हारस…..!
हे मुख्य कारण होते फ्रेंच राज्यक्रांतीचे..!
अमेरिकेन राज्यक्रांतीचे तात्कालिक कारण बोस्टन बंदरात इंग्लंडचे चहाचे जहाज बुडवले म्हणून युद्ध पेटले नव्हे,तर खरे कारण स्वातंत्र्य,समता न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये स्थापित आणि अधोरेखित करण्यासाठीचे हे युद्ध होते……
केवळ लेनिनचा उठाव हे जरी रशियन राज्यक्रांतीचे तात्कालिक कारण असले तरी खरे कारण हेहोते की,त्या देशातील शेकडो वर्षांपासून झारच्या अनियंत्रित राज्यसत्तेला जनता कंटाळलेली होती.हे मुख्य कारण होते.
थोडक्यात कोणत्याही सार्वजनिक संघर्षात जेंव्हा आपली भूमिका घेऊन प्रत्यक्ष सहभाग घेऊन व्यवस्थेविरुद्ध बंड करते.तेंव्हा त्या क्रांत्या,लढे,आंदोलने यशस्वी ठरतात.आणि विशेष म्हणजे गरीब आणि श्रीमंतीची, महागाई आणि बेरोजगारीची कृत्रिम दरी रुंदावत गेली की त्यातून लाव्हारस बाहेर पडल्यावाचून राहत नाही. शहे जागतिक इतिहासाने गेल्या 300 वर्षात सिद्ध केले आहे…..
आणि हेही तेवढेच खरे आहे की, जगाने सर्व सत्ताप्रकारांचा अनुभव घेतला.परंतू , लोकशाहीशिवाय कोणत्याही सत्ताप्रकारात हे रक्तरंजित पाट थांबविण्याची शक्ती नाही. परंतू त्या लोकशाहीला जागृतीच्या चढत्या आलेखाच्या अग्निच्या इंधनाची आवश्यकता असते.
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…