अपघाताला आमंत्रण देते आहे मरेगाव- खैरी – पवनपार रस्ता….

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि 

दखल न्यूज़ भारत

            सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव खैरी पवनपार या रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात असून याकडे संबधित बांधकाम उपविभाग लक्ष देणार का अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

           पुर्व भागातील हे रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. तालुक्यात अवकाळी पावसाने या रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक वेळा या रस्त्याने संबंधीत अधिकारी, लोकप्रतिनिधी ये – जा करीत असतांनाही दुरुस्तीकडे डोळे झाक पणा करत आहे.

         लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक काळात अश्वासने देतात, तद्नंतर त्यांना विसर पडतो की काय हा संशोधनाचा विषय आहे. या रस्त्यावर खड्ड्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढले आहे. सदर रस्ता हा दोन तिन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. संबंधीत बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दूरुस्ती बाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.

        नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचालक, शेतकरी, पादचारी यांना जीव मुठीत धरून मार्ग क्रमन करावे लागत आहे. सिंदेवाही तालुक्यातील या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला तसेच तांदूळाचेआदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. हा रस्ता सिंदेवाही येथील मुख्य बाजार पेठेला जाण्यासाठी परिसरातील कन्हाळगाव सामदा टेकरी पवनपार पवना व खैरी चक या गावांना शेतीमाल घेवून जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. तरी संंबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

          आज परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहे. वाहने नादूरुस्त होत असून वाहून चालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

             या रस्त्यावर दोन ते तीन वर्षांपासून खड्ड्याचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे अपघताच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी संबंधित बांधकाम विभागाने त्वरित दखल घेवून रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.