खल्लार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ वर्षीय संघ विभागीय स्तरावर…

 

युवराज डोंगरे/खल्लार

उपसंपादक

         श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, असलेल्या खल्लार हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथील १९ वर्षीय संघाची खो -खो मुलांचा संघ जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

        तळवेल येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात या संघाने विजय खेचून आणला असून या संघाची निवड विभागीय स्तरावर झाली आहे .तसेच वयोगट १४ मुलांचा खो-खो संघ चुरशीच्या सामन्यांमध्ये उपविजेता ठरला आहे.

        या दोन्ही संघांचे श्रेय मुख्याध्यापक डी. आर. नवरे तसेच क्रीडाशिक्षक ए .एस .मोपारी यांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन,कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे, मधुसूदन धाबे, सुधाकर जुनघरे,पंजाबराव टवलारे ,गुणवंतराव गावंडे यांनी कौतुक केले असून परिसरातील पालक व गावकरी यांनी वयोगट १९ च्या संघाचे विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीचे स्वागत केले आहे.