चिमूर तालुक्यात उद्या महशुल मंत्र्यांचा दौरा…. — ठिगळ झाकणार?

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादीका 

   अरमान बारसागडे 

 तालुका प्रतिनिधी चिमूर 

         महाराष्ट्र राज्याचे महशुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील उद्या सकाळी ९ वाजता चिमूर दौऱ्यावर येत आहेत.प्रशासकीय यंत्रणा द्वारा त्यांच्या आगमनास्तव औपचारिक रित्या त्यांचे स्वागत विश्राम भवन चिमूर केले जाईल.तद्वतच आमदार किर्तीकुमार भांगडिया हे सुध्दा त्यांचे भरभरुन स्वागत करतील आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याचा आशीर्वाद मिळवून घेतील.

             महशुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा चिमूर तालुका दौरा हा शेतकऱ्यांच्या रोगग्रस्त पिक पाहणीसाठी असल्याने शेतकऱ्यांच्या वतीने,”दखल न्यूज भारत वेबपोर्टल टिम,”त्यांचे मनपुर्वक अभिनंदन करते आहे,..

              ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन यासाठी की,एक कॅबिनेट मंत्री चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अळचणी,समस्या,आणि वास्तव आयुष्याचा जिवनक्रम जाणून घेण्यासाठी येत आहेत.

             पिक पाहणी नंतर शेतकऱ्यांना काय आर्थिक मदत केली जाते आणि केव्हा मदत केली जाते हे महशुल मंत्र्याच्या नियोजनावर अवलंबून असणार आहे.

        परंतु चिमूर तालुक्यातील सर्व पिक शेतकऱ्यांना एकसमान आर्थिक मदत होणे आवश्यक आहे‌.

      कारण,सोयाबीन,कपास,धान (भात पिक) पिक शेतकऱ्यांच्या पिकांना अतिवृष्टीने चांगलेच बदडले आहे‌.अतिवृष्टीमुळे तिन्ही प्रकारच्या पिकांवर रोगांचा पादुर्भाव झाला असून अर्ध्या पेक्षा कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

        या,ना,त्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने होणारे पिक नुकसान शेतकऱ्यांना दारिद्र्य बनवते व त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची करते.

            नैसर्गिक संकटाने ओढावलेली चिंताग्रस्त परिस्थिती झेलून किती झेलायची व कर्जाचे ठिगळ झाकून किती झाकायचे हा ज्वलंत मुद्दा शेतकऱ्यांना नेहमी सतावतो आहे.

            म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे महशुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील चिमूर तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदतीचा आधार देतील काय?हा मार्मिक प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने…