जादुटोणा करणे व त्यांच्यावर विश्वास करणे हा गुन्हाच आहे.:- पोलीस अधीक्षक निलोत्पल..

 

ऋषी सहारे

संपादक

 गडचिरोली _ जादुटोणा करणारा व त्यांच्यावर विश्वास ठेवणारा तितकाच गुन्हेगार आहे. अश्या लोकांवर पाळत ठेवून गुन्हे दाखल करणे पोलीस खात्याची जबाबदारी आहे. कारण २०१३ चा कायदा अस्तीत्वात आला आहे. असे विचार जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रमा प्रसंगी केले.

        महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन जनजागरण यात्रा गडचिरोली शहरात पोहचून एस.पी. कार्यालय गडचिरोली येथे पार पडला. सदर कार्यक्रमात एस.पी. निलोपल , अप्पर पोलीस अधिक्षक मिश्रा , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे सदस्य नंदिनी जाधव पुणे , रामभाऊ डोंगरे नागपूर ,भगवान रणदिवे पुणे , डॉ. चद्रशेखर डोंगरवार , समन्वयक प्रा. मुनिश्वर बोरकर आदि लाभले होते. पाण्याने आग विझविली जाते परंतु पाण्याने दिवा पेटवून उदघाटन करण्यात आले.

       याप्रसंगी नंदिनी जाधव यांनी सांगीतले की , ढोंगी बाबा’ बुवा, अंधश्रद्धा पसरवून पैसे कमवितात. भोळ्या भाबळ्या आदिवासींना लुटतात , असे अनेक बोवे ,खेळ्यात व जंगलात दबा धरून बसले आहेत. अश्या लोकाविरोधात आतापर्यत १२०० केसेस झालेल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्युनंतर जादुटोणा विरोधी कायदा अस्तीत्वात आला. आता डॉ. दाभोळकरांचे उर्वरीत कार्य करण्याची जबाबदारी पोलीस ,पोलीस पाटिल व कार्यकर्ते यांचेवर येवुन ठेपली आहे.

         याप्रसंगी रामभाऊ डोंगरे ,डॉ. चंद्रशेखर डोंगरवार यांचीही भाषणे झालीत. कार्याक्रमाचे प्रास्ताविक राहुल आव्हाड यांनी केले. कार्यक्रमास गडचिरोली तालुक्यातील पोलीस पाटिल , तटामुक्तीचे अध्यक्ष , पोलीस व अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.