सही करता करता तलाठी पडतो खुर्चीवरून.. — आता तर अवैध दारू विक्री अंतर्गत सरकारी कर्मचारी दारुच्या नशेतच डोलू लागलेत कार्यालयात?…

 

ऋषी सहारे

संपादक

        सर्वसामान्यांना दारू पिऊन पडून राहताना आपण बघत आलोच,पण महसूल विभागातील तलाठी पदावरील व्यक्ती असा नशेत असेल तर..?जनसामान्य जनते प्रतीच्या कर्तव्य सेवेचे काय?या प्रश्नावर कोण विचार करणार?

         गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांनाही छुप्या मार्गाने दारूची तस्करी करत विक्री केल्या जाते.अशातच कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी साजा क्रमांक आठ मधील तलाठी किशोर राऊत दारूच्या नशेत कार्यालयात जाऊन सही मारतांनाच खुर्चीवरुन खाली पडल्याची घटना 6 सप्टेंबर रोजी घडली.

           सदर घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात दारुबंदी आहे.पोलीस अधीक्षक निलोत्पल आल्यापासून जिल्ह्यातील अवैध दारु वर धाडसत्र राबविण्यात येत आहे.मात्र तरीही छुप्या मार्गाने दारूची विक्री केल्या जाते.

          कुरखेडा तालुक्यातील तलाठी कार्यालय सोनेरंगी साजा क्रमांक 8 येथील तलाठी किशोर राऊत हे गेल्या आठ- दहा दिवसापासून दारुच्या नशेत कार्यालयास हजर राहत असल्यामुळे ,शेतकऱ्यांना वेळेवर लागणारे दाखले व शेतीविषयक कामे होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बोंब होती. 

           याबाबत संबंधित मंडळ अधिकारी यांना माहिती देण्यात आली होती.दरम्यान 6 सप्टेंबर रोजी काही शेतकरी शेतीविषयक कामांसाठी तलाठी कार्यलयात गेले असता तलाठी राऊत हे एवढे दारुच्या नशेत होते की त्यांना सही करणेही अवघड होत होते.

           नशेत महसूल विभाग बुडाले की काय?असा स्थानिक जनता सवाल करत आहे.या प्रकारामुळे महसूल विभागाची मान खाली घालावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.