सिंदेसुर गावाचे‌ मोजमाप करुण गाव महसुली विभागात समाविष्ट करण्यात यावे…. — पत्रकार परिषदेतुन गावकऱ्यांची मागणी..

 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

भाविक करमनकर

धानोरा तालुक्यातील सींदेसुर गाव खुप दिवसांपासुन अस्तित्वात आहे.येथील लोक पूर्वीपासूनचे मूळ वसाहतदार आहेत. आम्ही सर्व आदिवासी असुन आमचे एकंदरीत 50 ते 60 घरांची वस्ती आहे. परंतु आमचे गाव हे आजतागायत महसूल विभागात समाविष्ट करण्यात आलेले नाही.गाव नकाशा, अधिकार अभिलेख तयार करणेकरीता भुमि अभिलेख कार्यालया मार्फत मोजणी करुन गावाला महसूल विभागात स्वतंत्र गावाची नोंद करुन देन्याची मागणी सिंदेसुर येथिल लोकांनी दिनांक ४/९/२०२३रोजी धानोरा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतुन केली आहे.

पत्रकार परिषदेत पुढे म्हटले आहे की, आम्ही सींदेसुर येथिल गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन दिले.त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असताना दिनांक १०/४/२०२३ला तहसीलदार धानोरा यांनी बैठक बोलावली.त्या बैठकीला उप-अधिक्षक,भुमि अभिलेख धानोरा उपस्थित असताना ही गावाची अद्यापही पुर्न मोजमाप झालेली नाही.या गावचे गाव नकाशा, अधिकार अभिलेख पंजी अजुनही तयार करन्यात आलेलि नाही.गावकर्यीनी ५०ते६०वर्षा पासुन जमिनीवर अतिक्रमण करून पट्टे मिळालेले नाही.त्यातही मोठी अडचण निर्माण होत असल्याचे व्यथा मांडले आहे.पुढे गावकरी म्हणतात कि, हे गाव पण्णेमारा ग्रामपंचायत मध्ये येत असुन दोन्ही गावे एकमेकांच्या जवळ असल्याने या गावांचे कपार्टमेंट नंबर सारखेच म्हणजे ६६६,६६७,६६८,६६९, आहेत. त्यामुळे ग्रामसभेमध्ये नेहमीच वाद निर्माण होतात. ६६६,६६७,कंपार्टमेंट वरति दोन्ही गावांतील गावकरी हक्क सांगत आहेत.

सींदेसुर ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणतात की वरील कंपार्टमेंट आमचे क्षेत्रात येते.हे ग्रामसभेने मान्य केले. सदर कंपाउंड नंबर हे आमचे क्षेत्रात येते.पण आमच्या गावाचे नाव नसल्याने आम्हा गावकऱ्यांच्या मुला बाळांच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण होत आहे.तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही.याबाबत आम्ही वारंवार संबंधित अधिकारी जिल्हा भुमिअभिलेख गडचिरोली, उप-अधिक्षक कार्यालय धानोरा तसेच जिल्हा कार्यालय यांना पत्रव्यवहार केला परंतु आजतागायत कोणत्याही कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आमच्या कामात अडथळा निर्माण झालेला आहे. याचा गावकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच आमचे मुले शिक्षणाकरिता आवश्यक कागदपत्र पासून वंचित आहेत तरी सदर मौजा सिंदेसूर गाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली हे गाव महसूल विभागात घोषित करण्याकरिता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख गडचिरोली यांना आदेश देऊन महसुली गाव घोषित करण्यात यावे.अशी मागणी पत्रकार परिषदेतुन केली.पत्रकार परिषदेला सिंदेसुर येथिल माजी सरपंच हरिष धुबे, सुनिल कुजुर,हन्नु एक्का,ओमप्रकाश केरकेट्टा,इग्णेस खेस,सामेल केरकेट्टा,नबी तिरकी,कलगसाय टोपो, हनुमान बित्तल एक्क,संजय धोपसाय मिंज,आदि गावकरी उपस्थित होते.