ब्रेकिंग न्युज… इंजेवारी ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र.. — सरपंचा सहित सदस्यांना शासकीय जागेवर अतिक्रमण करणे पडले महागात.. — जिल्हाधिकारी यांनी दिला आदेश…

 

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी-तालुक्यातील इंजेवारी ग्रामपंचायतच्या सरपंच-सदस्य सौ.अल्का योगाजी कुकडकर,सदस्य सविता कूसन दाणे,अर्चना डाकराम कुमरे व चुडाराम योगराज पात्रीकर ह्या चार सदस्यांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याचे पुरावे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी संजय मीना ह्यांनी चारही सदस्यांना अपात्र केले आहे.

          प्राप्त माहितीनुसार,इंजेवारी ग्रा.प.चे माजी सरपंच अतुल आकरे यांनी,ग्रामपंचायतच्या या चारही सदस्यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे १० ऑक्टोम्बर २०२१ ला अपील दाखल केली होती.

        त्याअनुषंगाने गैरअर्जदार अल्का कुकडकर व त्यांचे कुटुंबियांचे राहते घराचे मालमत्ता क्र. ०६ क्षेत्र ११८४ चौ. फुट असुन त्यांचेकडील असलेली महाराष्ट्र शासन अनुसूची “क” मध्ये त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२६.६९ चौ. मी. आहे.सदर प्रकरणात प्राप्त झालेले स्वयंस्पष्ट अहवाल व पुराव्यावरुन गैरअर्जदार नामे सौ. अल्का योगाजी कुकुडकर यांनी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयीन पत्र क्र. रानिआ/ग्रापनि/२०२०/प्र.क्र. ०१/का-०८, दि. १५/१२/२०२० तसेच समक्रमांकाचे पत्र दिनांक १६/१२/२०२० अन्वये जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका अंतर्गत माहे डिसेंबर २०२० मध्ये ग्रामपंचायत इंजेवारी येथे सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरताना अतिक्रमण नोंद असलेल्या मालमत्ता क्र. ५/१ व ५/२ चा उल्लेख केल्याचे आढळून आले.

          म्हणजेच त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना अतिक्रमण सोडलेले नव्हते.हे त्यांचे नामनिर्देशनपत्रासोबतचे उमेदवारांनी द्यावयाचे शपथपत्रामध्ये आणि सदस्य पदावर निवडून आल्यानंतर सुद्धा ही बाब प्रथमदर्शनी पुराव्यावरुन अतिक्रमण होते हे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात त्यांना अपात्र ठरविले आहे.

            गैरअर्जदार ग्रा.प.सदस्या सविता दाणे यांचे पती कुसन दाणे रा. इंजेवारी यांनी ग्रामपंचायतचा मासिक ठराव क्र. ६/१ दिनांक २६/०४/२०२१ मध्ये अतिक्रमण केलेली मालमत्ता क्र. ४८३ क्षेत्र ५६०० चौ.फुट खुली जागा सोडत असल्याचे नमुद केले आहे. 

         याचा अर्थ दिनांक २६/०४/२०२१ च्या ठरावामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांचे अतिक्रमण निवडून आल्यानंतर सुद्धा होते हे सिद्ध होते.

           त्याचप्रमाणे दिनांक १०/०३/२०२२ चे पत्रान्वये सादर केलेल्या चौकशी अहवालातील परिच्छेद क्र.३ अन्वये गैरअर्जदार सविता दाणे रा.इंजेवारी यांचे पती नामे कुसन दाणे रा.इंजेवारी यांनी त्यांचे नावावर ग्रामपंचायत रेकार्डला नमूना ८ प्रमाणे मालमत्ता क्र. ४८३ क्षेत्र ५६०० चौ. फुट अतिक्रमण असलेली खुली जागा दिनांक २६/०४/२०२१ रोजी ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभा ठराव क्र. ६/१ अन्वये इतिवृत्त नोंदवहीनुसार अतिक्रमण केलेली खुली जागा सोडत असल्याने सदर जागा ग्रामपंचायतीच्या कब्जात राहील असे ठरावाचे सत्यप्रती सादर केले आहे. 

           त्यामुळे सविता दाणे ह्या निवडून आल्यानंतरही त्यांचे अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी यांनी सदस्यपद अपात्र केले.

            सौ.अर्चना डाकराम कुमरे,ह्या ग्रामपंचायत इंजेवारी प्रभाग क्र. ३ मधुन सर्वसाधारण (स्त्री) या प्रवर्गातून निवडून आल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते.निवडून आल्यानंतर दिनांक २६/०४/२०२१ रोजी झालेल्या मासिक सभा ठराव क्र. ६/५ अन्वये अतिक्रमण केलेली खुली जागा सोडत असल्याचे ठरावाचे सत्यप्रतिद्वारे गैरअर्जदाराने लेखी सादर केले आहे.

            यावरुन हे स्पष्ट झाले की,ग्रामपंचायत सदस्य पदावर निवडून आल्यानंतरही गैरअर्जदाराचे शासकीय जमीनीवर अतिक्रमण कायम होते.हे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी यांनी अर्चना कुमरे यांना सदस्य पदावरून अपात्र केले आहे.

          ग्रा.प.सदस्य चुडाराम पात्रिकर यांनी स्वतःचे नाव मौजा इंजेवारी येथे मालमत्ता क्र.४७५ खाली जागेवर अतिक्रमण केल्याची नोंद नमुना ८ वर होती चुडाराम पात्रिकर हे निवडून आल्यानंतर २६/४/२०२१ च्या ठरावात अतिक्रमण सोडत असल्याचे ठराव घेतले.

          त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून आल्यानंतर सुद्धा सदर ठरावामुळे चुडाराम पत्रिकर यांचे अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर सुध्दा अपात्रतेची कारवाई करण्यात आली.

           चारही गैरअर्जदार, सदस्य,ग्रामपंचायत इंजेवारी,ता. आरमोरी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) चे कलम १४ (१) (ज-३) चा भंग केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत इंजेवारी चे सदस्य म्हणुन चालु राहण्यास अनर्ह ठरविण्यात येत आहे तसेच ग्रामपंचायत इंजेवारी मधील पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.