पारशिवनी येथे राजेंद्र मुळक यांच्या जनसंपर्क कार्यालयात विजयी जल्लोष… — रामटेक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांचा दणदणीत विजय…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी 

पारशिवनी:-पारशिवनी येथे राजेंद्र मुळक यांच्या जनसंपर्क कार्यालयात विजयी जल्लोष रामटेक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांचा दणदणीत विजय झाल्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र मुळक यांचा जनसंपर्क कार्यालयात विजय जल्लोष साजरा केला.

            लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि महायुतिचे उमेदवार राजू पारवे हे रिंगणात उभे होते.रामटेक लोकसभा मतदार संघा तुन भरघोष मतानी विजयी झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरणात श्यामकुमार बर्वे यांनी महायुतिचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभवकरित दणदणीत विजय मिळवला.

            या विजयाने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांनी पारशिवनी येथे माजी मंत्री व जिल्हा काग्रेस चे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा जनसंपर्क कार्यालयात विजय जल्लोष साजरा केला.

            नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी रामटेक लोकसभा मतदार संघात रखडलेल्या विकास कामाला गती देऊन नागरिकांच्या समस्यांचे समाधान करावे, अशी आशा त्याचे सत्कार करण्याकरिता आलेले पारशिवनी चे कार्यकर्ते मध्ये नागपुर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस उपाध्यक्ष वसीम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ता बबलू शेख, युवक कॉंग्रेस नेता अज्जु पठान, नासिर पठान,जोहेब शेख,हर्षल गजभिये, वाहिद शेख, ज़ालिम शेख, संजय बैस, बालू सोनटक्के, शेखर महाजन, निजाम बाघाड़े, राकेश साखरे, अमित अंबादे, पूनम अंबादे, रेहान शेख, एड. अहबाज पठान, डॉ. दानिश पठान, जावेद पठान, विनोद भुते, माजी उपसरपंच कुकराज कामडे, प्रवीन गोरले, प्रदीप कुहीटे, पारशिवनी यांनी सत्कार करून विजयी जश्न करून मिठाई बाटुन फटाके फोडून जश्न केले तसेच नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार वर्बे यांनी नागरिकांडून व्यक्त केली.