जख्मी मेंढपाळास अनुदानाची प्रतीक्षा…. — वर्षापूर्वी वाघाच्या हल्यात झाला जख्मी… — वर्ष लोटन्याच्या मार्गावर…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

बोथली -पाथरी मार्गे नदिलगत असलेल्या आपल्या शेळया मेंढ्यांच्या कळपावर रात्रि बिबटयाने हल्ला केला. एका शेळीला फस्त करुण पुन्हा कळपावर हल्ला करण्याच्या बेताने आलेल्या बिबटयाने कळपा लगत झोपुन असलेल्या मेंढपाळ भीमा वर हल्ला केले.

           जख्मी भिमाच्या आरड़ाओरड़याने बिबटयाने घटना स्थळावरुण पळ काढला लगतची जनता धाऊन आली वन क़ार्मचारी आले, पंचनामा झाला. जख्मिला प्राथमिक उपचार करुण करुण पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रूगालयात भर्ती करन्यात आले.

           या संदर्भात काही कागदपत्र वन विभागाला सादर करुण सुधा अनुदान मिळू शकले नाही या घटनेला जवळपास एक वर्षाचा काळ लोटत असल्याचे जख्मी भीमा अनुदानाच्या प्रतिक्षेत असल्याचे भीमा कडून सांगितले जात आहे.

           भीमा कंन्नावार रा.बेंबाळ ५५ वर्ष हा मेंढपाळ असून गेली कित्येक वर्षा पासून तो बोथली परिसरा लगत असलेल्या शेतात वास्तव्याला आहे. वडीलोपार्जित आपला व्यवसाय शेळया मेंढ्यां पालनाचा असल्याने शेतात आपला कळप बसऊन कुटुंबाचा प्रपंच भागवित आहे मात्र या भागात वन पशुचि मोठी दहशत असल्याने कधी वाघाचे हल्ले तर कधी वन्य जीवांची भेट त्यामुळे या भागात वन्यपशुची मोठी दहशत निर्माण झाली आहे.

          मागील वर्षी याच काळात क़ळ पावर हल्ला करुण भिमाला जख्मी केल्या नंतर त्याला वन विभागा कडून अनुदान मिळू शकले नाही. अनेकदा वन कार्यालयात हेलपाटया मारुनही काही फायदा होऊ नशकल्याची खंत भीमा व्यक्त करीत आहे.

             तेव्हा वाघ्याच्या हल्यात गरीब जख्मी भिमाला अनुदान देन्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी वन कर्मचारी यानी मदत करावी अन्यथा वाघाच्या हल्यात जख्मी झालेला भीमा अनुदानापासुन वंचित राहिल.