मुक्तीपथ लघु नाट्याचा आयोजीत कार्यक्रम संपन्न :- आयु.सुनंदा गायकवाड नागपूर यांची माहिती..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

              वृत्त संपादीका

        मुक्तीपथ लघु नाट्याचे आयोजन दिनांक 4-06-24 ला पचंकमेटी,बोधी वृक्षबुद्ध विहार, बजरंग नगर नागपूर येथे करण्यात आले होते.या नियोजित कार्यक्रमानुसार 11 वाजता मुक्तीपथ लघु नाट्य प्रयोगाचे सादरीकरण बुद्ध जयंती निमित्त करण्यात आले.  

       डॉ.एम.एस.वानखेडे,आयु.हरीश भगत,शैलजा भगत,सुनंदा गायकवाड,जया कलिहारी,सिमा थुल,नंदा पंचभाई,वदंना धनविजय,गुफां पाटिल,मनिषा पाटील,संध्या वारके,वदंना सुटे या कलावंतांनी भूमिका पार पाडली असुन जया व संध्या वाळके यानी जाभुंळे सरानी लिहिलेले गिते सादर केली. 

        पंचकमेटी बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयु.ईश्वरजी कडबे यांनी मुक्ती पथ नाट्यचे लेखक,दिग्दर्शक,गित,रचना कार एम.एस.जाभुंळे साहेब यांना सामाजिक परिवर्तन पथनाट्यकार म्हणून गौरविण्यात आले.  

      सर्व कलावंताचे कौतुकातंर्गत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सर्व कलावंतानी परिश्रम घेतले,व प्रयोग यशस्वी पार पाडला. 

       आयु.कडबे साहेबांनी सर्वश्वी कलावंतचे आभार मानले.