इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन.वलारमथी यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

 

जय वाघे

ग्रामीण प्रतिनिधी चिमूर..

 

        भारताच्या चांद्रयान ३ या मिशनमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. 

        चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

            चंद्रयान ३ च्या उड्डाणापूर्वी एन.वलारमथी यांनीच त्याचं उलटं टायमर लावलं होत.तसेच चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होताच त्यांनी सहकाऱ्यांसह देशाला आनंदाची बातमी दिली होती. 

        त्यामुळं आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन.वलारमथी यांच्या निधनामुळं भारतासह जगभरात शोक व्यक्त केला जात आहे.

            दिवसांपूर्वी चंद्रयान ३ चंद्रावर उतरवून आनंद साजरा करणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

           “दखल न्यूज भारत परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…,