सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा निरोप व सत्कार समारंभ.. — हृदयस्पर्शी कार्यक्रमाची अनोखी झलक मने जिंकून गेली..

 

ऋषी सहारे

संपादक

 

 आरमोरी :- तालुक्यातील डोंगरगाव केंद्राकडून दिनांक 1 मे 2023 ला केंद्रातील जि.प.प्राथ.शाळा ठाणेगाव नवीन येथे २०२२-२३ या सत्रात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.सी. सलामे शिक्षण विस्तार अधिकारी आरमोरी, उद्घघाटक एन.डी.कोकुडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी , प्रमूख पाहुणे नलिनी शेडमेखे केंद्रप्रमुख, शंकर कुकडकार अध्यक्ष शा.व्य. स. ठाणेगाव , सौ.शैला निमकर(उपाध्यक्ष), सदस्य शैलेंद्र गजभिये, प्रमोद भूरसे, खुशाल नैताम तसेच केंद्रातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. 

        या कार्यक्रमा मध्ये जी.बी. राठोड जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,आर.के.सोमनकर उच्च श्रेणी मुख्याध्यापक,सौ. एम. एम. मने , सौ. डी.बी.चुटे , गंगाधर भोयर , आशा चिलमवार यांचा केंद्रातील शिक्षकातर्फे शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व निरोप देण्यात आला. 

       याप्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या सेवाकाळाचा गौरवपूर्ण उल्लेख मनोगतातून व्यक्त केला.आपण आयुष्यभर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी कार्य केल्याचे आर. के सोमनकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मेश्राम व कु.शितल चापले यांनी केले तर आभार सचिन मेश्राम यांनी मानले.

        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील मुख्याध्यापक सी . एम. बांबोळे, यु. एन. मसराम, पी . एम. कुंभारे, एम. एम. कुळमेथे तथा केंद्रातील सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य केले.