गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक पद भरती रद्द करा… — आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे संतोष सुरपाम यांनी केली निवेदनाद्वारे मागणी.

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

     पदभरती मध्ये आदिवासीसाठी पद असणे संवैधानीक आहे,आपन स्वता कुलगुरू यांच्याशी चर्चा करु असे दिले आश्वासन..

 

गडचिरोली :- 

    येथील गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा प्राध्यापक पदभरतीची जाहीरात employment notice/50/2023 दि.04/02/2023 रोजी एकुन 30 पदाची जाहीरात प्रसिद्ध केली होती.पण त्यात एकही अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव जागा ठेवल्या गेली नाव्हती.

       त्यामुळे ही पदभरती तत्काळ रद्द करावी अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत संतोष,छबिलदास सुरपाम यांनी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि गोंडवाना विद्यापीठाने काढलेल्या जाहीराती मध्ये ईग्रजी -1.गणीत -1 ,रसायनशास्त्र-4, भौतिकशास्त्र-4,कॉम्पुटर सायन्स-4,ऊपयोजीत अर्थशास्त्र -4,मराठी-4,एमबीए-4,जनसंवाद-4,असे एकुण विविध विषयातंर्गत प्राध्यापकांच्या ३० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवायची आहे.

       परंतु त्यांमध्ये एसी-1,विजे(ए)-1,एनटी(सी)-2,एनटी(डी)-1,एसबीसी-1,ओबीसी-9,ईडब्ल्यूएस- 3,व ओपन -9 पण यात अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता करीता एकही जागा राखीव न ठेवल्याने ही जाहीरात व प्राध्यापक पदभरती रद्द करावी,त्या सोबतच संवर्गनिहाय पदभरती न करता विषय निहाय आरक्षण देऊन पदभरती करावी,अशा आशयाचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावीत,यांना निवेदन दिले.

       याविषयी आपण गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याशी स्वत: वार्तालाप करु आणी अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव असल्याशिवाय पदभरती होणार नाही असे आश्वासन अध्यक्ष संतोष सुरपाम यांना दिले असल्याची माहीती त्यांनी दिली आहे.