नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून वीर बाबुराव शेडमाके यांचे विचार जनमानसा पर्यंत पोहचतील – आ. देवराव होळी. 

 

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली _ क्रातीविर बाबुराव शेडमाके नाटक एक गडचिरोली जिल्ह्यातील विरांची कथा कहाणी व त्यांचे विचार जनमानसा पर्यत पोहचतील असे सुंदर नाटक अनिरुद्ध वनकर यांनी सादर केले आहे. मंत्रालय भारत सरकारने सहकार्य केले आहे.असे विचार आमदार डॉ. देवराव होळी यांनी विर बाबुराव शडमाके या नाटकाच्या उदघाटनाप्रसंगी मांडले.

             नॅशनल स्कूल ऑफ नवि दिल्ली मंत्रालय भारत सरकार , लोकजागृती संस्था चंद्रपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या सहकार्याने अभिनय लॉन गडचिरोली येथे क्रातीविर बाबुराव शेडमाके या नाटकाचा प्रयोग निःशुल्क दाखविण्यात आला. कार्यक्रमांचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठचे रजिस्टॉर डॉ. अनिल हिरेखन हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी ‘ माजी नगराध्यक्ष अॅड राम मेश्राम, डॉ. सचिन मडावी , माधवराव गावड , कवि वसंतराव कुलसंगे , माजी सभापती मारोतराव ईचोळकर डॉ. शेखर डोंगरे ” सामाजीक कार्यकर्ता प्रा. मुनिश्चर बोरकर , संगिता टिपले दिल्ली. आदि लाभले होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की , वीर बाबुराव शेडमाके हे नाटक आदिवासींचे भुषण आहे.

         सदर नाटक हे जिल्हयातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात गाजले पाहीजे यासाठी शासनाने प्रयत्न करावा. याप्रसंगी एड. राम मेश्राम यानी आपले विचार व्यक्त केले. डॉ. हिरेखन म्हणाले की अनिरुद्ध वनकर सहीत ३५ कलाकाराचा हा संच संपूर्ण एक महिना मेहनत घेऊन गोंडवाना विद्यापिठ गडचिरोली च्या सहकार्याने निःशुल्क नाटक सादर केले. यापुढेही गोंडवाना विद्यापिठाचे सहकार्य लाभेल. प्रास्ताविक नाटककार अनिरुद्ध वनकर यांनी गोंडवाना विद्यापीठत नाट्य विभाग व नाटय अभ्यासक्रम सुरु केल्यास आदिवासी जिल्ह्यातील कलाकारांना वाव मिळेल. कार्यक्रमास श्रोत्यांची गर्दी जमली होती.